गळफास लावून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:37+5:302021-03-17T04:08:37+5:30
कन्हान : अज्ञात कारणावरून गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर येथे रविवारी (दि.१४) ...

गळफास लावून तरुणाची आत्महत्या
कन्हान : अज्ञात कारणावरून गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर येथे रविवारी (दि.१४) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
माेहम्मद फिराेज माेहम्मद हनीफ सय्यद (२६, रा. कामठी काॅलनी खदान नं. ३) असे मृत तरुणाचे नाव आहे. माेहम्मद फिराेजला दारूचे व्यसन हाेते. घटनेच्या दिवशी शिवनगर येथील नवीन घरी जाताे, असे सांगून ताे घरून निघून गेला हाेता. दरम्यान, फिराेजने नवीन घराच्या मधल्या खाेलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती शेजाऱ्यांनी फाेनद्वारे दिली. लागलीच कुटुंबीयांनी नवीन घर गाठून पाहिले असता, फिराेजने दारूच्या नशेत गळफास लावून ताे मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी माेहम्मद जुवेद माेहम्मद हनीफ सय्यद (२८) यांच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस नाईक रंगारी करीत आहेत.