गळफास लावून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:09 IST2021-01-18T04:09:21+5:302021-01-18T04:09:21+5:30

खापरखेडा : राहत्या घरी गळफास लावून एका अविवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन भानेगाव ...

Young man commits suicide by hanging | गळफास लावून तरुणाची आत्महत्या

गळफास लावून तरुणाची आत्महत्या

खापरखेडा : राहत्या घरी गळफास लावून एका अविवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन भानेगाव येथे रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सुशांत सुनील देऊळकर (२२, रा. नवीन भानेगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे काही दिवसांपूर्वी पुणे येथे नाेकरीवर लागला हाेता. घटनेदरम्यान आई शेजाऱ्यांकडे गेली हाेती तर वडील कामावर गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीच नसल्याचे पाहून सुशांतने बेडरूममध्ये दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. अशात त्यांच्या घरचा कुत्रा जाेरात भुंकू लागल्याने सुशांतची आई घरी आली असता, बेडरूममध्ये सुशांत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. खापरखेडा पाेलिसांना घटनेची सूचना देण्यात आली. लागलीच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयाे हाॅस्पिटलमध्ये पाठविला. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडली, अशी घटनास्थळी बघ्यांमध्ये कुजबुज सुरू हाेती. वृत्त लिहिस्ताेवर त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Web Title: Young man commits suicide by hanging