गळफास लावून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST2021-07-23T04:07:42+5:302021-07-23T04:07:42+5:30

सावनेर : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे ...

Young man commits suicide by hanging | गळफास लावून तरुणाची आत्महत्या

गळफास लावून तरुणाची आत्महत्या

सावनेर : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे साेमवारी (दि.१९) रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

दीपक ऊर्फ बिबा पांडुरंग नारनवरे (३२, रा. दत्तमंदिरजवळ, पाटणसावंगी, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घरी कुणीही नसताना दीपकने दारूच्या नशेत आपल्या घरातील हाॅलमध्ये लाकडी मयालीला दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दरम्यान, कुटुंबीयांना ही बाब आढळून येताच पाेलिसांना सूचना देण्यात आली. याप्रकरणी ज्याेती दीपक नारनवरे (३०, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) यांच्या तक्रारीवरून सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, घटनेचा पुढील तपास पाेलीस हवालदार जुनघरे करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide by hanging