तरुणाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST2021-06-21T04:07:56+5:302021-06-21T04:07:56+5:30
खात : सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या तरुणाने घरी गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, त्याने प्रेमविवाह केला हाेता. ही ...

तरुणाची गळफास लावून आत्महत्या
खात : सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या तरुणाने घरी गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, त्याने प्रेमविवाह केला हाेता. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खात येथे रविवारी (दि. २०) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
कार्तिक श्रीराम धांडे (२८, रा. खात, ता. माैदा) असे मृताचे नाव आहे. कार्तिकने सहा महिन्यापूर्वी तंटामुक्ती समितीच्या मध्यस्थीने खात येथील ग्रामपंचायत भवनात प्रेमविवाह केला हाेता. त्यानंतर दाेघांनीही अराेली येथे वेगळे राहायला सुरुवात केली. तीन महिन्यापूर्वी त्याने पत्नीच्या आईच्या घराजवळ किरायाने घर घेतले हाेते. त्यातच पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणामुळे खटके उडायचे. शेजाऱ्यांनी दाेघांनाही समजावून सांगण्याचा सल्ला वारंवार दिला. पण, दाेघेही समजण्यापलीकडे हाेते. त्यातच पत्नी त्याला आत्महत्या करण्याची धमकी देत हाेती. या कटकटीला कंटाळून कार्तिक रविवारी दुपारी खात येथे आला. त्याने स्वत:ला खाेलीत बंद करून घेतले. काही वेळाने कार्तिक छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.