गळफास लावून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:14+5:302021-05-24T04:08:14+5:30
पारशिवणी : काैटुंबिक वादातून रागाच्या भरात तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पारशिवणी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डाेलामाइन परिसरात ...

गळफास लावून तरुणाची आत्महत्या
पारशिवणी : काैटुंबिक वादातून रागाच्या भरात तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पारशिवणी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डाेलामाइन परिसरात रविवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली.
आश्विन ऊर्फ मिंटू शारदाप्रसाद त्रिपाठी (३८, रा. कांद्री, कन्हान), असे मृत तरुणाचे नाव आहे. आश्विन हा शनिवारी सायंकाळी रागाच्या भरात घरून निघून गेला हाेता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शाेध घेतला. मात्र, ताे कुठेही आढळून आला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास माहुलीनजीकच्या डाेलामाइन परिसरातील शिवमंदिराजवळ एका झाडाला गळफास लावून ताे मृतावस्थेत शेतकऱ्यांना आढळून आला. याबाबत पारशिवणी पाेलीस ठाण्यात सूचना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पारशिवणी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.