गळफास लावून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:08 IST2021-04-27T04:08:38+5:302021-04-27T04:08:38+5:30

बाजारगाव : राहत्या घरी गळफास लावून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बाजारगाव येथे साेमवारी (दि.२६) दुपारी २ ...

Young man commits suicide by hanging | गळफास लावून तरुणाची आत्महत्या

गळफास लावून तरुणाची आत्महत्या

बाजारगाव : राहत्या घरी गळफास लावून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बाजारगाव येथे साेमवारी (दि.२६) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

राेशन भीमराव बाेरकर (३५, रा. बाजारगाव) असे मृताचे नाव असून, त्याला मुलगा व मुलगी आहे. त्याची पत्नी मुलीसह गेल्या दीड वर्षापासून माहेरी आहे. साेमवारी राेजच्या प्रमाणे राेशनने कुटुंबीयांसाेबत जेवण केले. वडील आपल्या कामावर गेल्यानंतर राेशनने त्याच्या आईला मी माझ्या खाेलीत आराम करताे, असे सांगून खाेलीत गेला हाेता. दरम्यान, त्याने खाेलीत सिलिंग पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. अशात त्याचा मुलगा खाेलीत गेला असता, राेशन छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच काेंढाळी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Young man commits suicide by hanging