शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विचार तर कराल ! लग्नकार्यात चोरीसाठी भाड्याचे नातेवाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 06:21 IST

मध्य प्रदेशातील गाव; आई-बाबा, काकू, भाऊ अन् अल्पवयीनही उपलब्ध

नरेश डोंगरे 

नागपूर : जगात सर्व काही मिळते मात्र आईबाबा मिळत नाही, असे म्हणतात. मात्र, मध्यप्रदेशात एक गाव असे आहे, जेथे मामा, मावशी, काका, काकू, भाऊ अन् आई-बाबाही मिळतात. भाड्याने व माफक दरात! अर्थात चोरी करण्यासाठी ! राजगड जिल्ह्याच्या पचोर तालुक्यातील छोट्या गावाचे नाव आहे, कडिया सांसी. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गावातील बहुतांश मंडळीचा व्यवसाय आहे चोरी करणे. तरुण मंडळी चोरीचे कटकारस्थान करतात अन् वयस्क मंडळी त्यांना चोरीसाठी तसेच चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करतात.

राहिली छोटी मंडळी. पण सात-आठ वर्षांच्या चिमुरड्यांचे चोरीचे कसब तोंडात बोटे घालायला लावणारे आहे. या गावातील चार जण नागपूर पोलिसांच्या हाती लागले. त्यातील एक १४ वर्षांचा आहे. एक २६, दुसरा ३२ वर्षांचा आहे. तर, काकू ४५ वर्षांच्या आहेत. २६ वर्षीय मोहित महेंद्रसिंग आणि ३२ वर्षीय सन्नी छायल छोट्या मुलांना चोरीसाठी तयार करतात.

मोठ्या शहरात हे बिनबुलाये मेहमान छान ब्लेझर, वेस्ट कोट अन् चकचकीत कपडे घालून मोठ्या हॉटेल्स, सेलिब्रेशन हॉल, लॉन्समधील लग्न समारंभात शिरतात. वर-वधूच्या बाजुला त्यांना मिळणारे पैशाची पाकिट वगैरे कोण जमा करतो. वर-वधूचे आईवडील, भाऊबहिण बॅग (पर्स) घेऊन मिरवतात, त्यांनाही हे मोठे हेरतात अन् इशाऱ्यानेच लहानग्याला सांगतात. त्यानंतर लहान मुलगा संधी मिळताच रोख रक्कम, दागिन्यांची पर्स उचलतो अन् वेगात तेथून बाहेर पडतो.असे होते ‘कमाई’चे वाटपबाहेर असलेले त्याचे कथित भाऊ ही मुद्देमाल ताब्यात घेतात अन् मिनिटांतच परिसरातून दूर निघून जातात. तारांकित हॉलमधील लग्न म्हटले की किमान दोन तीन लाखांचा ऐवज मिळतोच.भाड्याने आई म्हणून आणलेल्यामहिलेला त्यातील ५ ते १० हजार आणि तेवढीच रक्कम चोरीत महत्त्वाची भूमिका वठविणाºया लहान मुलाला (त्याच्याआई-वडिलांना) दिली जाते.

टॅग्स :nagpurनागपूरmarriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश