शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तुम्ही अपमान केलाय, पण परत या; महापौर संदीप जोशी यांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 07:52 IST

आपण राग सोडून सभागृहात परत यावे , ही सभागृहाची भावना असल्याने मंगळवारी होणाऱ्या सभागृहात मनाचा मोठेपणा दाखवून उपस्थित राहावे, अशी विनंती सभागृहाचा प्रमुख म्हणून व महापौर या नात्याने संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना रविवारी पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

ठळक मुद्दे शनिवारी सभागृहाबाहेर आपली बसचे कर्मचारी, दिव्यांग बांधव मागण्यासाठी आंदोलन करीत होते तर दुसरीकडे राजकीय नेत्यासारखे आयुक्तांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते होते. आयुक्तांच्या फोटोचे बॅनर धरून घोषणा करीत हो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या इतिहासात शनिवारी सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी सभागृह सोडून जाण्याची दुर्दैवी तितकीच क्लेशदायक घटना घडली. याचे मला अत्यंत वाईट वाटते. आपले नाव नागपूर महापालिकेच्या इतिहासात घटनेची पायमल्ली करताना नोंदविले. मनपा कायद्यानुसार सभागृह हे सार्वभौम आहे. आपण सभागृहातून निघून जाणे हा सभागृहाचा अपमान आहे. त्यामुळेच सभागृह स्थगित केले आहे. आपण राग सोडून सभागृहात परत यावे , ही सभागृहाची भावना असल्याने मंगळवारी होणाऱ्या सभागृहात मनाचा मोठेपणा दाखवून उपस्थित राहावे, अशी विनंती सभागृहाचा प्रमुख म्हणून व महापौर या नात्याने संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना रविवारी पाठविलेल्या पत्रातून केली आहे.सभागृहाचे काही नियम असतात. लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचे काही अधिकार असतात. सभागृहात नगरसेवक माहिती देण्यासाठी बोलत असेल किंवा अधिकारी उत्तर देत असेल तर कुठलाही नगरसेवक ‘पॉईंटऑफ ऑर्डर’ अथवा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ या खाली बोलणाऱ्याला मध्ये थांबवून आक्षेप नोंदवू शकतो. नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांच्या प्रश्नावर आपण उत्तर देत असताना ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकरजी तिवारी यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ घेतले. मी बोलत असताना कुणीही मध्ये बोलू नये ही आपली चुकीची भूमिका संपूर्ण सभागृहाने अनुभवली. याचवेळी ‘मी सभागृहात थांबत नाही’ अशी भावना आपण व्यक्त केली. परंतु थांबलात, त्यानंतर लगेच ग्वालबंशी यांनी आपल्या नावासंदर्भात काही शब्दच्छल केला. ज्याचे समर्थन कुणीही करणार नाही. हे शब्द सभागृहाच्या रेकॉर्ड वरून काढण्यास आपण विनंती केली असती तर ते काढण्याचे आदेश मी तात्काळ दिले असते. सभागृहात असे प्रकार अनेकदा होतात. आपण सरळ सभागृहाचाच त्याग करणे हे वर्तन ‘आयुक्त’ या पदाची गरिमा, सभागृह, तसेच लोकशाहीची गरिमा कलंकित करणारे असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.शहर व विकासासाठी हानीकारकनिर्देशानुसार अतिरिक्त आयुक्तांनी आपल्याला भ्रमणध्वनीवरून सभागृहात येण्याची विनंती केली. मी सुध्दा आपणास भ्रमणध्वनीवरून सभागृहात येण्याची विनंती केली. मात्र ‘जिथे माझा अपमान होत असेल तिथे मी येणारच नाही’ अशीच भूमिका कायम ठेवली. ही भूमिका सभागृहाच्या दृष्टीने आणि शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले.आवश्यक कामासाठी निधी द्यामहोदय, कोविड-१९ च्या काळात या शहराला आपली गरज आहे. मात्र कुठेतरी जनप्रतिनिधींशी संवाद ठेवणे, त्यांचेही कधी-कधी ऐकून घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण आज पावसाच्या पाण्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसले आहे, गडरचे चेंबर तुटले आहेत, घाण पाणी घरात घुसले आहे, नागरिक नगरसेवकांना जाब विचारतात. आपण आश्वासनानंतरही यासाठी निधी दिला नाही. त्यामुळे नगरसेवक चेंबरही बनवू शकत नाही ही सत्यस्थिती आहे. कृपया याची आपण दखल घ्यावी ही विनंती.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSandip Joshiसंदीप जोशी