शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

तुम्ही एसटीची तिजोरी भरा, आम्ही तुमचे खिसे भरू; एसटीची नवी योजना

By नरेश डोंगरे | Updated: September 14, 2024 02:38 IST

३० दिवसांचा प्रयोग : वाहक-चालकांना प्रोत्साहन भत्ता

नागपूर : अडथळ्यांची शर्यत पार कडून उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या उत्पन्नात भर घालण्यासाठी आता एक नवी योजना जाहिर केली आहे. शुक्रवारी १३ सप्टेंबरला जाहिर झालेली ही योजना एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी आहे, हे विशेष !

जुनाट बसेसमुळे रस्त्यात लालपरीचे कधीही रुसून बसणे, अचानक लागणाऱ्या आगी, अपघात, कर्मचाऱ्यांचे प्रश्न कामगारांच्या प्रलंबित मागण्याच्या पुर्ततेसाठी संघटनांकडून संपाचे वारंवार मिळणारे ईशारे आदी एक ना अनेक अडथळे पार करत एसटीच्या लालपरीची धावपळ सुरू आहे. तिच्या या रात्रंदिवसाच्या परिश्रमाला उत्पन्नाची झालर लागावी म्हणून एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या योजना जाहिर केल्या जातात.

गेल्या वर्षी महिलांना सरसकट पन्नास टक्के प्रवास भाड्यात सवलत जाहिर झाली आणि एसटीला लक्ष्मी पावली. एसटीच्या प्रवाशी संख्येत तसेच उत्पन्नातही लक्षवेधी भर पडली. सुगीचे दिवस आल्यागत एसटी बसेस भरभरून धावत आहेत. एकीकडे हे असे सुखद चित्र असताना काही चालक-वाहक अलिकडे प्रवाशांकडे दुर्लक्ष करत असल्याचीही तक्रार आहे. बसमध्ये जागा असूनही प्रवाशांनी कुठे हात दाखविला तर एसटीचे चालक वाहक त्या प्रवाशांना दुर्लक्षित करून पुढे निघून जातात. अशा तक्रारी वाढल्या असतानाच यामुळे एसटीला होणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नालाही फटका बसत आहे. ते ध्यानात घेऊन एसटी महामंडळाने चालक-वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना जाहिर केली आहे. आज १३ सप्टेंबरला राज्यातील मुंबई, नागपूरसह सर्वच विभाग नियंत्रकांना या योजनेसंबंधीची माहिती पाठविण्यात आली आहे.

अशी आहे योजना -२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या ३० दिवसांच्या कालावधीत प्रायोगिक तत्वावर महामंडळाकडून ही योजना राबविली जाणार आहे. या दिवसांतील प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाची गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर) प्रत्येक दिवसाच्या उत्पन्नाची तुलना केली जाईल. त्यानंतर गेल्या वर्षी या कालावधीत किती उत्पन्न होते आणि त्यापेक्षा किती जास्त उत्पन्न यावेळी मिळाले, त्या आकड्यांचा हिशेब केला जाईल.चालक, वाहकांना मिळणार २० टक्के -प्रत्येक आगाराचे लेखाकार आणि सहायक वाहतूक अधीक्षक आर्थिक ताळेबंद काढून रक्कम तपासतील. त्यानंतर गेल्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा जेवढी जास्त (अतिरिक्त) रक्कम मिळाली, त्याच्या २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक, वाहकांना (१० - १० टक्के) विभागून दिली जाईल.

...तर, मिळणार नाही भत्ता -या कालावधीत परिश्रम घेऊन, विशेष प्रयत्न करून चालक वाहकाने एसटीच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न ओतले आणि चुकून त्यांच्यापैकी कुण्या चालक वाहकाने प्रवाशांसोबत गैरवर्तन केले, त्याची तक्रार आल्यास त्या चालक किंवा वाहकाला प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळणार नाही. 

टॅग्स :nagpurनागपूर