शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

होम आयसोलेशन आहात, प्रोटीनयुक्त आहार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 10:54 IST

होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांनी प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास प्रकृती सुधारण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे पोळी कमी करून भाज्या, डाळींचा आहार वाढवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची काळजी घेतलेली असतानाही कोविड-१९ची लागण झालेले अनेक रुग्ण आहेत. यामुळे शंका कुशंकांना स्थान न देता, या आजाराची भीती न बाळगता आयुष्यात आलेले एक नवीन आव्हान म्हणून त्याला स्वीकारण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांनी प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास प्रकृती सुधारण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लक्षणे नसलेल्या किंवा अति सौम्य लक्षणे असलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या ५,६६३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये म्हणजे गृह अलगीकरणात आहेत. परंतु ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि कोणतीही लक्षणे न दिसणाºया रुग्णांना जर इतर दीर्घकालीन स्वरूपाचे आजार असतील तर त्यांनी होम क्वारंटाईनचा आग्रह धरू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय, रुग्णाच्या घरी आवश्यक त्या सुविधा, म्हणजे वेगळी खोली, स्वतंत्र टॉयलेट असतील तरच हा पर्याय निवडावा, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-आहारात निष्काळजीपणा नकोडॉक्टरांनुसार, रुग्णाचे वय, आरोग्य आणि जुने आजार लक्षात घेता आहारात कोणताही निष्काळजीपणा करू नये. सकस आहार घेतल्यास रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते आणि या विषाणूचा खात्मा करण्यासाठी शरीरामध्ये रोगप्रतिकारक पेशी जास्त प्रमाणात विकसित होण्यास मदत मिळते.

-हलका व रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारा आहारआरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्णांना पचण्यास हलका आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारा आहार द्यावा. सोबत रुग्णाच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता होणार नाही, याचीही पूर्ण काळजी घ्यावी. विशेषत: ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘व्हिटॅमिन डी’चा शरीराला पुरवठा होणे गरजेचे आहे. सोबतच गरम पाणी, ताज्या भाज्या, खिचडी आणि हलक्या डाळीचा समावेश आहारामध्ये कराव्यात. यामुळे रुग्णाच्या शरीराला ऊर्जा मिळण्यास, थकवा दूर होण्यास, पांढºया रक्तपेशींची संख्या वाढण्यास मदत मिळते.

-मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावेजेवणामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. सोबतच हाडांचेही नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. स्वयंपाकामध्येही कमी प्रमाणातच तेल वापरावे.

-जास्त पाणी प्याआहारामध्ये साखरेचेही प्रमाण संतुलित ठेवा. जर मधुमेहाचा त्रास असेल तर साखर अजिबात खाऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्या. ताजी फळे खा आणि शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. तंबाखू व मद्यपान करू नये. धूम्रपान करणाºया व्यक्तींपासून दूर राहावे.

- डाळी व भाज्यायुक्त आहार घ्यावाकोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी आपल्या आहारात प्रोटीनची मात्रा वाढवायला हवी. रुग्ण जर मांसाहार करीत असेल तर त्याने आपल्या आहारात अंडीचा समावेश करावा. जे मांसाहार करीत नाहीत त्यांनी पनीर, दूध यांचा वापर वाढवायला हवा. जेवणात चणा, राजमासह इतर डाळींचा समावेश करावा. जेवणात तीन-चार चपाती आणि एक वाटी डाळ घेत असाल तर एक चपाती कमी करून दोन वाटी डाळ घ्यावी. आहारात भाज्या व डाळीचे मिश्रण असलेली खिचडी घ्यावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी बदाम, अक्रोडचे सेवन करावे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी चणे, भाजलेले शेंगदाणे घ्यावे. सायंकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ वापरावे.-कविता गुप्ताआहारतज्ज्ञ-तणावमुक्त राहाहोम आयसोलेशन असलेल्या रुग्णांसाठी विशेष अशा औषधी नाहीत. यामुळे पौष्टिक आहार वाढवावा. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. कारण, तणावात राहाल तर तणावाच्या हार्माेन्सचे प्रमाण वाढते. आनंदी राहिल्यास हॅपी हार्माेन्सचे प्रमाण वाढून रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत करते. सकारात्मक विचार ठेवा. वेळ घालविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा. मित्रांशी फोनवरून गप्पा मारा. नियमित व्यायाम करा. लक्षणे वाढल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.-डॉ. अविनाश गावंडेवैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस