उमरेडच्या पोलीस ठाण्यात ‘योग’शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:06 IST2021-06-22T04:06:53+5:302021-06-22T04:06:53+5:30

उमरेड : पतंजली योग समिती, योग शिक्षक महासंघ, उमरेड युथ फाऊंडेशन, कोलपॉवर फाऊंडेशन आणि उमरेड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त ...

Yoga school at Umred police station | उमरेडच्या पोलीस ठाण्यात ‘योग’शाळा

उमरेडच्या पोलीस ठाण्यात ‘योग’शाळा

उमरेड : पतंजली योग समिती, योग शिक्षक महासंघ, उमरेड युथ फाऊंडेशन, कोलपॉवर फाऊंडेशन आणि उमरेड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस ठाण्यात ‘योग’विषयक विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्या गेले. लहान मुले, तरुण आणि पोलीसदादांनी सक्रिय सहभाग घेत ही योग ‘शाळा’ यशस्वी केली. योग समिती तालुका प्रभारी संगीता मिश्रा तसेच राखी जुमडे यांनी योगाभ्यासाचे धडे दिले. यावेळी पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, अनिल गोविंदानी, सचिन कुहीकर, कैलास लारोकर, शशिकांत पवार, बट्टूलाल पांडे, प्रशांत खोब्रागडे, हरिश्चंद्र दहाघाने, संजय घुग्घुसकर, इंद्रायणी फुकट आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन कृष्णकुमार मिश्रा यांनी केले. सतीश तांबेकर यांनी आभार मानले. गोलू जैस्वानी, किशोर आदमने, रितेश राऊत, सौरभ भिवगडे, शुभम सिर्सीकर, प्रफुल्ल वाघमारे, प्रांजल डहाके, मुकेश गौतम, सचिन जोधे, सृजन गौतम, प्रवीण लाडेकर, सीमा बैस, पूनम चव्हाण, मनीषा पवार आदींनी सहकार्य केले.

Web Title: Yoga school at Umred police station