शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

योगामुळे निरोगी आरोग्य व विचारशक्ती वाढते : राम खांडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:52 IST

राम खांडवे म्हणाले, योग फक्त शरीराबद्दल नसतो, ते जगण्याचे साधन आहे. त्याद्वारे माणूस सुजाणतेच्या क्षेत्रात जाऊ शकतो आणि स्वत: अस्तित्वासह एकता प्राप्त करू शकतो.

ठळक मुद्देमोफत योगा वर्गाचा पाचवा वर्धापनदिन 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्राच्या शाखेत सकाळी ७ ते ८ पर्यंत घेण्यात येणाऱ्या मोफत योगा वर्गाचा पाचवा वर्धापनदिन केंद्रात साजरा करण्यात आला.जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सचिव राम खांडवे आणि चिटणवीस केंद्राचे विश्वस्त विलास काळे कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. संजय अरोरा यांनी खांडवे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, तर शालिनी अरोरा यांनी विलास काळे यांना सन्मानित केले.राम खांडवे म्हणाले, योग फक्त शरीराबद्दल नसतो, ते जगण्याचे साधन आहे. त्याद्वारे माणूस सुजाणतेच्या क्षेत्रात जाऊ शकतो आणि स्वत: अस्तित्वासह एकता प्राप्त करू शकतो. त्यामुळे मनुष्याला विचार करण्यावर आणि स्वार्थी वागण्यावर मर्यादा येते. हाच आनंद जनार्दन स्वामींना जनसामान्यांना द्यायचा होता. म्हणूनच जनार्दन स्वामींनी योगाभ्यास मंडळाच्या माध्यमातून १९५१ पासून योगा वर्ग सुरू केले.विलास काळे म्हणाले, चिटणवीस सेंटरमध्ये प्रत्येक दिवस अशा निस्वार्थी कृत्याने सुरुवात होत असल्याबद्दल आनंद आहे. संपूर्ण कॅम्पसमध्ये दिवसभर सकारात्मकता बाळगण्यास मदत होते. स्वत:चे अनुभव कथन करताना त्यांनी आतापर्यंत दरदिवशी योग करीत असल्याचे सांगितले.डॉ. संजय अरोरा म्हणाले, १५ नोव्हेंबर २०१४ चिटणवीस सेंटरमध्ये मोफत योगा वर्गाला सुरुवात झाली. आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त साधकांनी लाभ घेतला आहे. यावेळी साधकांनी स्वत:चे अनुभव कथन केले. ताणतणाव कमी झाल्याचे सांगितले. सकाळच्या सत्रामुळे शांतता आणि ऊर्जा वाढली आहे.प्रारंभ संगीता मंत्री यांनी राम खांडवे आणि प्रेरणा चांडक यांनी विलास काळे यांची ओळख करून दिली. प्रवीण अग्रवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन चेतना सूचक यांनी केले तर कल्पना शुक्ला यांनी आभार मानले. निरोगी आरोग्यासाठी मोफत योगा वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Yogaयोगnagpurनागपूर