शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

निकालांचा ‘येवले पॅटर्न’ : उत्तम प्रशासक म्हणून प्रमोद येवले यांचा नावलौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:03 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यामुळे विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ठळक मुद्दे‘हायटेक’ सुधारणा, परीक्षा प्रणालीत बदल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यामुळे विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळत असताना डॉ.येवले यांनी परीक्षा प्रणालीला ‘सुपरफास्ट’ बनविले. निकालांचा ‘येवले पॅटर्न’ राज्यभरातील विद्यापीठांनी अवलंबला, हे विशेष. डॉ.प्रमोद येवले यांची एक उत्तम प्रशासक व तंत्रज्ञानाची जाण असणारे अधिकारी म्हणून ओळख आहे.नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा डोलारा कोलमडला असताना डॉ.येवले यांनी जून २०१५ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाची सूत्रे हातात घेतली. सर्वप्रथम निकालांची गाडी त्यानी रुळावर आणली. त्यांच्याच पुढाकारातून अर्ज भरण्यापासून ते प्रश्नपत्रिकांची ‘डिलिव्हरी’, अनेक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, निकाल या सर्व बाबी ‘ऑनलाईन’च करण्यात झाल्या आहेत. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनदेखील ‘ऑनस्क्रीन’ पद्धतीने सुरू झाले आहे. यामुळे निकालांचा वेग वाढला. अगदी राज्यातील व राज्याबाहेरील इतर विद्यापीठांनी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा अभ्यासदेखील केला व डॉ.येवले यांचे मार्गदर्शन घेतले.

‘पीएचडी’ प्रक्रिया केली कडकनागपूर विद्यापीठातून ‘पीएचडी’ करणे अतिशय सोपे असते, असा एक सर्वसाधारण समज होता. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार नागपूर विद्यापीठातील नियमदेखील कडक करण्यात आले. नोंदणीसाठी अनिवार्य असलेली ‘पेट’ कठीण करण्यात आली. त्यामुळे चाळणी प्रक्रिया सुरू झाली व ‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबली. सोबतच ‘कोर्सवर्क’चीदेखील प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी सुरू झाली असून संशोधनाचा दर्जा उंचावला आहे.

संस्कृत विद्यापीठालाही दिली गतीडॉ. प्रमोद येवले यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणूनदेखील जबाबदारी सांभाळली होती. अवघ्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी तेथील परीक्षा प्रणालीतदेखील अनेक सकारात्मक बदल केले. तेथील परीक्षा विभाग एकाच ठिकाणी स्थानांतरित केला. शिवाय संस्कृत अभ्यासक्रमांचे मूल्यांकनदेखील ‘ऑनस्क्रीन’ होण्यास सुरुवात झाली.

‘फार्मसी’ क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर ओळखडॉ.प्रमोद येवले यांना शिक्षक म्हणून ३४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. यातील १५ वर्षे त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्यादेखील सांभाळल्या. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या ५४ शोधपत्रिका प्रकाशित झाल्या. तर त्यांच्या नावावर चार पेटंट आहेत. तीन पुस्तकेदेखील त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९ संशोधकांनी ‘पीएचडी’ पूर्ण केली. नागपूर विद्यापीठाच्या ‘फार्मसी’ विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते व व्यवस्थापन परिषद, विधीसभेचेदेखील सदस्य होते. मागील महिन्यातच त्यांचे ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’चे सदस्य म्हणून नामनिर्देशन झाले. विशेष म्हणजे डॉ.येवले हे राज्याच्या मागासवर्गीय आयोगाचेदेखील सदस्य आहेत. ‘असोसिएशन ऑफ फार्मास्युटिक टीचर्स ऑफ इंडिया’चे ते अध्यक्ष होते तर ‘इंडियन सोसायटी ऑफ फार्मकोग्नॉसी’चे उपाध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी सांभाळली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ