शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘यस्स… वी आर द बेस्ट!’; नागपुरात टीम इंडियाच्या ‘वर्ल्ड कप’ विजयाचे जंगी सेलिब्रेशन

By योगेश पांडे | Updated: March 8, 2026 23:33 IST

Nagpur News: भारताने सलग दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकत क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व कायम ठेवले आणि नागपूरकर आनंदाने अक्षरशः रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन केले. सामना संपताच शहरातील रस्ते, चौक आणि मैदानांवर चाहत्यांचा जल्लोष उसळला.

- योगेश पांडेनागपूर  - भारताने सलग दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकत क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व कायम ठेवले आणि नागपूरकर आनंदाने अक्षरशः रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन केले. सामना संपताच शहरातील रस्ते, चौक आणि मैदानांवर चाहत्यांचा जल्लोष उसळला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीच्या घोषणा आणि नाचगाण्यांनी संपूर्ण शहरात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले.

रविवारचा दिवस आणि त्यात भारत-न्यूझीलंडचा टी-ट्वेंटी विश्वचषकातील ‘हाय व्होल्टेज’ अंतिम सामना असल्याने सकाळपासूनच क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अनेकांनी कामे बाजूला ठेवून टीव्हीसमोर तळ ठोकला होता. काही भागांत मोठ्या स्क्रीनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सामना सुरू होण्यापूर्वी काही मंदिरांमध्ये चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थनाही केली.

पहिल्या इनिंगमध्ये भारताने दमदार बॅटिंग करत अडीचशेचा आकडा गाठल्यानंतरच चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आले होते. सामन्याचा शेवट भारताच्या विजयाने होताच शहरात आनंदाचा स्फोट झाला. अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने सीमारेषेजवळ झेल घेतला अन दिवसभर शांत असलेले रस्ते क्षणार्धात लोकांनी भरून गेले. धरमपेठ, सदर, वर्धमाननगर, महाल, फुटाळा, इतवारी या भागांत तरुणांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता. ‘कमॉन इंडिया’, ‘भारत माता की जय’, ‘चक दे इंडिया’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात तरुणांनी नाचत आनंद व्यक्त केला. महाल-इतवारी परिसरात फटाक्यांची जबरदस्त आतषबाजी करण्यात आली. काही चौकांमध्ये चाहत्यांनी एकमेकांना मिठाई, लाडू वाटून विजयाचा आनंद साजरा केला. अनेकांनी तिरंगा हातात घेत रॅली काढत आनंदोत्सव साजरा केला.

लक्ष्मीभुवन चौकात तरुणाई थिरकलीरविवारची सुटी आणि त्यात मिळालेला ऐतिहासिक विजय यामुळे आनंदाला आणखी उधाण आले. धरमपेठेतील लक्ष्मीभुवन चौक येथे तरुणांची मोठी गर्दी उसळली होती. येथे तरुणांसोबतच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकदेखील नाचत-गात सेलिब्रेशन करताना दिसून आले. अनेक कुटुंबेही घराबाहेर पडून या उत्सवाचा भाग बनली. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचादेखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रेस्टॉरेन्ट, ढाबे हाऊसफुलशहरातील अनेक रेस्टॉरंट्स, कॅफे आणि चौकांमध्ये रात्री उशिरापर्यंत चाहत्यांची गर्दी कायम होती. अनेकांनी केवळ ‘फायनल’साठी शहराबाहेरील रिसॉर्ट आणि फार्महाऊस बुक केले होते. सायंकाळपासूनच तेथे गर्दी दिसून आली. सामना संपल्यावरदेखील तेथे मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन झाले.

सोशल माध्यमांवर फक्त ‘शर्मा-सॅमसन-बुमराह’चा जलवासोशल मीडियावरही भारताच्या विजयाचा जल्लोष दिसून आला. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲपवर अभिनंदनाच्या संदेशांचा अक्षरशः पाऊस पडत होता. मीम्स, व्हिडीओ आणि क्रिएटिव्ह पोस्टद्वारे चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला. विशेषत: सलामीवर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन व जसप्रीत बुमराह हे तर या ई-सेलिब्रेशनचे ‘शोस्टॉपर’ ठरले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Celebrates India's T20 World Cup Victory in Style!

Web Summary : Nagpur erupted in joy as India clinched the T20 World Cup. Streets filled with celebrations, fireworks, and dancing. Youngsters rejoiced, distributing sweets and waving the tricolor. Restaurants and cafes buzzed with excitement, while social media celebrated Sharma, Samson, and Bumrah.
टॅग्स :T20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६India VS New Zealandभारत विरुद्ध न्यूझीलंडTeam Indiaभारतीय क्रिकेट संघnagpurनागपूर