शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: होय...माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे होणार नाही; राज ठाकरेंनी दिली कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:34 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी आणि सोमवारी नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

नागपूर- 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी आणि सोमवारी नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरेंनी नागपुरातील मनसेची सर्व महत्वाची पदं बरखास्त करत असल्याची घोषणा केली. घटस्थापनेला नवं पदाधिकारी आणि कार्यकारिणी जाहीर करेन, असं राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं. मनसेची पद बरखास्त करण्याची वेळ आली म्हणजे तुमचं विदर्भाकडे दुर्लक्ष झालं असं वाटत नाही का? असं राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी उघडपणे याची कबुली देखील दिली. 

"होय, माझ्याकडून आणि आमच्या सहकाऱ्यांकडून दुर्लक्ष झालं. पण यापुढे असं होणार नाही", असं एका वाक्यात राज ठाकरेंनी विदर्भाकडे झालेल्या दुर्लक्षाची कबुली दिली. नागपुरातील मनसेची पदं बरखास्त करण्याचं कारण देखील यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आलं. "नागपुरात काही चुकीची कामं सुरू होती. पक्षाला १६ वर्ष झाली पण त्यामानानं अपेक्षित पक्ष वाढीचं काम नागपुरात झालेलं नाही. त्यामुळे पदं बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच नव्या चेहऱ्यांना संधी देणं देखील महत्वाचं आहे. पक्षात काही तरुण फायरब्रँड कार्यकर्ते आहेत त्यांना पुढे आणलं पाहिजे असं मला वाटतं", असं राज ठाकरे म्हणाले. 

नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्तराज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नागपुरातील मनसेच्या सर्व महत्वाची पदं बरखास्त करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. "नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आमचे जे काही सेल्स आहेत. महत्वाची पदं आहेत ती बरखास्त करत आहे. घटस्थापनेच्या दिवशी नवी कार्यकारणी जाहीर करेन. आता २७ सप्टेंबरला पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक आहे. त्यानंतर २८ तारखेला आमचे काही नेते नागपूरात येतील. नवरात्रीनंतर मी कोल्हापूरमार्गे कोकण दौरा करणार आहे. त्यानंतर दोन दिवसांसाठी मी पुन्हा नागपुरात पक्ष बांधणीसाठी येणार आहे", असं राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे