यंदा ‘इलेक्ट्रॉनिक्स’कडे विद्यार्थ्यांची पाठ

By Admin | Updated: July 29, 2015 03:07 IST2015-07-29T03:07:35+5:302015-07-29T03:07:35+5:30

एकेकाळी विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीक्रमावर असलेल्या अभियांत्रिकीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’ व संगणक शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे.

This year's text of the students is 'Electronics' | यंदा ‘इलेक्ट्रॉनिक्स’कडे विद्यार्थ्यांची पाठ

यंदा ‘इलेक्ट्रॉनिक्स’कडे विद्यार्थ्यांची पाठ

नागपूर : एकेकाळी विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीक्रमावर असलेल्या अभियांत्रिकीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’ व संगणक शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत याच दोन शाखांमधील जागा सर्वात जास्त प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत. नागपूर विभागात एकूणच अभियांत्रिकी प्रवेशाबद्दल विद्यार्थ्यांचा निरुत्साह कायम राहिल्याचे चित्र दिसून आले. शेवटच्या फेरीनंतर विभागात ४५ टक्के जागा रिक्त आहेत.
विभागातील ५७ महाविद्यालयांतील २४ हजार ९९२ जागांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. परंतु प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या वेळीच विद्यार्थ्यांचा निरुत्साह दिसून आला. संचालनालयातर्फे यासंदर्भात तारखा वाढवण्यात आल्या. अभियांत्रिकीच्या सर्व प्रवेश फेऱ्यांनंतर ११ हजार ३१७ जागा रिक्त राहिल्या आहेत. म्हणजेच केवळ ५५ टक्के जागांवरच प्रवेश होऊ शकले.(प्रतिनिधी)
‘सिव्हील’, ‘इलेक्ट्रीकल’ हिट
जर अभियांत्रिकीतील शाखानिहाय प्रवेशाच्या आकडेवारीकडे लक्ष टाकले तर यंदा ‘इलेक्ट्रॉनिक्स’ व संगणकाशी संबंधित शाखांपेक्षा विद्यार्थ्यांनी ‘सिव्हील’ व ‘मेकॅनिकल’ या ‘कोअर’ शाखांनाच प्राधान्य दिले आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स’शी संबंधित ३७ टक्के जागा रिक्त आहेत तर संगणकाशी संबंधित २६ टक्के जागा रिक्त आहे. त्यातुलनेत ‘सिव्हील’ (८ टक्के) व ‘इलेक्ट्रीकल’ (१२ टक्के) या शाखांमधील रिक्त जागांचे प्रमाण बरेच कमी आहे.
महाविद्यालयांचे प्रयत्न पडले अपुरे
जास्तीत जास्त विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वळावेत आणि प्रवेश वाढावेत याकरिता महाविद्यालयांनी निरनिराळे प्रयत्न केले. अनेकांनी विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या प्रकारच्या योजना, स्कॉलरशीप तसेच सोयीसुविधांचे आश्वासन दिले होते. परंतु महाविद्यालयांचे हे सर्व प्रयत्न अपुरे पडल्याचेच चित्र या आकड्यांवरून दिसून येत आहे.

Web Title: This year's text of the students is 'Electronics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.