यंदाचे विक्रमी तापमान : उकाडा वाढला -नागपूर ४७.१
By Admin | Updated: May 31, 2015 02:43 IST2015-05-31T02:43:34+5:302015-05-31T02:43:34+5:30
उपराजधानीतील तापमानाने यावर्षीचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. शनिवारी नागपुरात ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

यंदाचे विक्रमी तापमान : उकाडा वाढला -नागपूर ४७.१
नागपूर : उपराजधानीतील तापमानाने यावर्षीचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. शनिवारी नागपुरात ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
यापूर्वी मागील आठवड्यात ४७ अंशापर्यंत पारा चढला होता. परंतु त्यानंतर तो खाली घसरला होता. मागील पाच वर्षांतील सर्वोच्च तापमानाचा आढावा घेतल्यास २०११ मध्ये ४४.८ अंश से.ची नोंद करण्यात आली असून, २०१२ मध्ये ४६.६, २०१३ मध्ये ४७.९ व २०१४ मध्ये ४५.६ अंश सेल्सिअची नोंद आहे.
शुक्रवारी नागपुरात ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. परंतु शनिवारी त्यात पुन्हा वाढ होऊन पारा ४७.१ अंशावर पोहोचला आहे. मागील दोन आठवड्यापासून सूर्य विदर्भात आग ओकू लागला आहे. यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. वाढत्या गरमीमुळे नागपूरकर त्रस्त झाले असून, आता मान्सूनची प्रतीक्षा करू लागले आहेत.
शनिवारच्या विक्रमी तापमानामुळे दुपारी शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. उपराजधानीतील या तापमानासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील पारा वर चढला आहे.(प्रतिनिधी)