तपासणीनंतर यवतमाळच्या वाघाला मारण्याची परवानगी; राज्यमंत्री येरावार यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:23 PM2017-12-21T21:23:22+5:302017-12-21T21:23:48+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील वाघ नरभक्षक असल्याबाबतची खात्री झाल्यास त्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा ,पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत गुरुवारी लक्षवेधीच्या उत्तरात केली.

Yavatmal to kill Vaghala after inspection; Minister of State Yerawar announced | तपासणीनंतर यवतमाळच्या वाघाला मारण्याची परवानगी; राज्यमंत्री येरावार यांची घोषणा

तपासणीनंतर यवतमाळच्या वाघाला मारण्याची परवानगी; राज्यमंत्री येरावार यांची घोषणा

Next
ठळक मुद्देवाघ नरभक्षक असल्याची खात्री झाल्यानंतरचा निर्णय

आॅनलाईन लोकमत
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ५ शेतकरी व १६ गुरांचा मृत्यू झाला आहे. तपासणीनंतर वाघ नरभक्षक असल्याबाबतची खात्री झाल्यास त्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा ,पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत गुरुवारी लक्षवेधीच्या उत्तरात केली.
काँग्रेसचे आमदार हरिसिंग राठोड यांनी लक्षवेधीतून हा मुद्दा उपस्थित केला होता. वाघाच्या हल्ल्यात पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील १० ते १२ लोकांचे बळी गेले आहेत. अनेक जनावरे मारली. वाघाला पकडण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे राठोड यांनी निदर्शनास आणले. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
जुलै ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील पाच लोकांचे मृत्यू झाले आहेत. १६ जनावरे मारली. वाघाला पकडण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी आठ लाखांची मदत दिली जाणार असल्याचे येरावार यांनी सांगितले. सदस्य सुनील तटकरे, प्रवीण दरेकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

 

Web Title: Yavatmal to kill Vaghala after inspection; Minister of State Yerawar announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.