यशवंतराव चव्हाण एक जाणते व्यक्तिमत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:18+5:302021-03-13T04:13:18+5:30
नागपूर : यशवंतराव चव्हाण हे तळागळातील कार्यकर्त्यांचे कैवारी होते. त्याचप्रमाणे दुर्बल घटकांवर लक्ष ठेवणारे, शेतीविषयक धोरणाबाबत पुरोगामी दृष्टिकोन ठेवणारे ...

यशवंतराव चव्हाण एक जाणते व्यक्तिमत्त्व
नागपूर : यशवंतराव चव्हाण हे तळागळातील कार्यकर्त्यांचे कैवारी होते. त्याचप्रमाणे दुर्बल घटकांवर लक्ष ठेवणारे, शेतीविषयक धोरणाबाबत पुरोगामी दृष्टिकोन ठेवणारे नेते होते. आपल्या कर्तृत्वाने अमर झालेल्या आणि कर्तृत्वाने कीर्ती प्राप्त केलेल्या भाग्यवान मंडळींमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी अजनी चौक, वर्धारोड, नागपूर येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात माजी आमदार दीनानाथ पडोळे, अनिल अहिरकर, बजरंगसिंह परिहार यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी तात्यासाहेब मते, सेवा दल प्रदेश कार्याध्यक्ष जानबा मस्के, चरणजितसिंह चौधरी, दुष्यंत गाटपिने, रवींद्र मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विजय मसराम, राजेश टेंभुर्णे, मच्छिंद्र आवळे, बबलू चव्हाण, मंदार हर्षे, प्रमोद जोंधळे, ॲड. सुदर्शन पनकुले, राजेश तिवारी, प्रशांत लांडगे, राहुल येन्नावार, प्रमोद सार्वे, सूरज बोरकर आदींनी परिश्रम घेतले.
_________________________________