यशोधरानगर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST2021-02-27T04:09:08+5:302021-02-27T04:09:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंधाऱ्या ठिकाणी दरोड्याचा कट रचत असलेल्या सशस्त्र गुंडांच्या मुसक्या बांधून यशोधरानगर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या ...

यशोधरानगर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंधाऱ्या ठिकाणी दरोड्याचा कट रचत असलेल्या सशस्त्र गुंडांच्या मुसक्या बांधून यशोधरानगर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून घातक शस्त्रेही जप्त करण्यात आले.
सय्यद आसिफ उर्फ भुऱ्या सय्यद निझाम, शेख अफसर ताजू पहेलवान, आकाश उर्फ मच्छी राजेश भोतक, राकेश आनंद बोरकर आणि मोहम्मद शोएब मोहम्मद अकिल अशी अटक करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत.
प्रवेशनगरातील एका नाल्याजवळ हे भामटे गुरुवारी मध्यरात्री दरोड्याचा कट रचत असल्याची माहिती यशोधरानगरचे ठाणेदार अशोक मेश्राम यांना मिळाली. त्यांनी लगेच गस्ती पथकाला तिकडे कारवाईसाठी पाठविले. पोलिसांनी आरोपींना गराडा घालून त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून तलवार, चाकू, लोखंडी रॉड , मिरची पावडर, नायलॉनची दोरी जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
---