यशोधरा पोलिसांनी पकडले रेती तस्करांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:42+5:302021-02-05T04:50:42+5:30
सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू नागपूर : बोलेरोने धडक दिल्याने सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. डिप्टी सिग्नल येथील ६३ वर्षीय ईश्वर ...

यशोधरा पोलिसांनी पकडले रेती तस्करांना
सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू
नागपूर : बोलेरोने धडक दिल्याने सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. डिप्टी सिग्नल येथील ६३ वर्षीय ईश्वर साहू हे १ फेब्रुवारीला सायकलने जात होते. लकडगंजच्या सुदर्शन चौकदरम्यान अज्ञात बोलेरोचालकाने साहू यांना टक्कर मारली. त्यांना मेयो रुग्णालयात पोहचविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
युवकाचा मृत्यू; गुन्हा दाखल
नागपूर : बाइक घसरल्याने युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोषींवर बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ११ डिसेंबर २०२० रोजी प्रकाश चामटे (३२) गाडीखाना, आशिष अशोक आडे (२८) हे दुचाकीवर जेवण करण्यास जात होते. बेलतरोडी येथील पांजरी पुलाजवळ त्यांची दुचाकी घसरली, त्यात प्रकाश व आशिष जखमी झाले. उपचारादरम्यान प्रकाशचा मृत्यू झाला. बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली. चौकशीत आशिषचा निष्काळजीपणा झाल्याचे लक्षात आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.