याकूबच्या नातेवाईकांनी रद्द केले तिकीट
By Admin | Updated: July 30, 2015 03:01 IST2015-07-30T03:01:35+5:302015-07-30T03:01:35+5:30
याकूब मेमनला ३० जुलैला फाशी देण्याचा निर्णय झाल्यामुळे त्याला भेटण्यासाठी त्याचे चार नातेवाईक गीतांजली एक्स्प्रेसने नागपुरात येणार होते.

याकूबच्या नातेवाईकांनी रद्द केले तिकीट
गीतांजली एक्स्प्रेसचे केले होते आरक्षण
नागपूर : याकूब मेमनला ३० जुलैला फाशी देण्याचा निर्णय झाल्यामुळे त्याला भेटण्यासाठी त्याचे चार नातेवाईक गीतांजली एक्स्प्रेसने नागपुरात येणार होते. परंतु त्यांनी आपल्या प्रवासाची तिकिटे रद्द केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्याचा निर्णय झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांची नागपुरात ये-जा वाढली आहे. बुधवारी २९ जुलैला याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर अंतिम निर्णय होणार होता. त्यामुळे त्याच्या चार नातेवाईकांनी २९ जुलैला रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ गीतांजली एक्स्प्रेसने मुंबई ते नागपूर असे तिकिटाचे आरक्षण केले होते. यात सीता, निशा, फातिमा आणि जावेद या चौघांनी पीएनआर क्रमांक ८१३६३३४७७३ नुसार तिकिटाचे आरक्षण केले होते. त्यांना या पीएनआरनुसार एसी थ्री या कोचमध्ये (बी-१, बर्थ क्रमांक ३५, ३६, ३७, ३८) बर्थही मिळाले होते. परंतु अचानक त्यांनी वसई रोड स्टेशनमध्ये आपले तिकीट रद्द करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान याकूबचे नातेवाईक गीतांजली एक्स्प्रेसने येणार असल्याची माहिती कळताच पोलिसांनीही या गाडीवर गस्त वाढविली होती. (प्रतिनिधी)