शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

याकूब मेमनचा नंबर २४ वा

By admin | Updated: July 16, 2015 03:08 IST

नागपूर कारागृहातील फाशी यार्डात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत २३ जणांना फासावर लटकविण्यात आले.

लोकमतविशेषराज्यात फाशीला प्रारंभ नागपूर कारागृहातून राहुल अवसरे  नागपूरनागपूर कारागृहातील फाशी यार्डात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत २३ जणांना फासावर लटकविण्यात आले. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन यालाही याच कारागृहात फाशी दिली जाणार असल्याने त्याची ही फाशी २४ वी राहणार आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची स्थापना १८६४ मध्ये झाली. नागपूर आणि येरवडा या दोन ठिकाणी फाशी देण्याची व्यवस्था आहे. येथील कारागृहात सर्वप्रथम नंदाल याला २५ आॅगस्ट १९५०, जकिया नारायण याला २२ सप्टेंबर १९५० , सीताराम नुहो याला २० फेब्रुवारी १९५०, सीताराम परय्या याला २६ जून १९५१, इरामन्न उपयोरसी याला ३ आॅगस्ट १९५१, भाम्या गोडा याला ४ आॅक्टोबर १९५१, सरदार याना याला १२ जानेवारी १९५२, नियतो कान्हू याला ३ आॅगस्ट १९५२, अब्दुल रहेमान इम्रानखान याला ५ आॅगस्ट १९५२, गणपत सखाराम याला २ सप्टेंबर १९५२, सखाराम फोकसू याला २४ सप्टेंबर १९५२, विनसा हरी याला १९ मार्च १९५३, जागेश्वर मारोती याला १९ जून १९५३, प्रेमलाल अमरीश याला ४ जुलै १९५३, लोटनवाला याला १५ सप्टेंबर १९५३, दयाराम बालाजी याला ३ फेब्रुवारी १९५६, अब्बासखान वजीरखान याला २८ आॅगस्ट १९५९, बाजीराव तवान्नो याला १५ फेब्रुवारी १९६०, श्यामराव पांडुरंग याला ८ जुलै १९७०, नाना गंगाजी याला १९ जानेवारी १९७३, मोरीराम शाद्याजी गोदान याला १७ एप्रिल १९७३ आणि वानखेडे बंधू यांना ५ नोव्हेंबर १९८४ रोजी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर कुणालाही फासावर लटकविण्यात आले नाही. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी महाल भागातील स्वातंत्र्यवीर शंकर महल्ले यांना फाशी दिली होती. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत विविध हत्याकांडातील २३ जणांना फाशी देण्यात आली. २५ आॅगस्ट १९५० रोजी पहिल्यांदा पंथेयाडी नंदाला नावाच्या आरोपीला फासावर लटकवण्यात आले होते. त्यानंतर १५ डिसेंबर १९५२ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात पहिली फाशी एका आरोपीला देण्यात आली. स्वतंत्र्यानंतर राज्यात आतापर्यंत ५८ जणांना फाशी देण्यात आली. याकूबला फाशी दिल्यानंतर याच कारागृहात वाडीतील एका बालिकेवरील बलात्कार-खुनातील आरोपी वसंता दुपारे यालाही फिशी दिली जाऊ शकते. या आरोपीचीही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानेही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.