शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
3
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
4
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
5
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
6
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
7
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
8
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
9
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
10
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
11
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
12
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
13
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
14
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
15
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
16
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
17
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
18
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
19
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
20
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर

‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ भावगीताने गिनीज रेकॉर्डसह रचला इतिहास! हजारो विद्यार्थ्यांची एकसुरात ‘स्वरांजली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:12 IST

या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर १५,४०२ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहिले आणि इतकेच विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्वितीय आदरांजली अर्पण केली. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे...’ या विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनाद्वारे विद्यार्थ्यांनी एक सूर, एक भावना आणि एकात्मतेचा मंत्र गुंजवला आणि याच भावगीताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह चार जागतिक विक्रमांची नोंद केली.

या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर १५,४०२ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहिले आणि इतकेच विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले. या विक्रमी उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर करण्यात आले.

विक्रमाचे प्रमाणपत्र कुलगुरूंकडे सुपुर्दया गीतगायनातून ‘एकाच गाण्याचे सर्वाधिक सहभागी असलेले ऑनलाइन व्हिडीओ अल्बम’ म्हणून विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. याशिवाय ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ या तिन्ही संस्थांनीदेखील विद्यापीठाचा विक्रम अधिकृतपणे मान्य केला. 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी इमा ब्रेन (इंग्लंड) यांनी कार्यक्रमस्थळीच विक्रमाची घोषणा करत विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे आणि आयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान केले.

मानवतेचा धर्मच सर्वोच्च : नितीन गडकरीजग संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अशा वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला मानवतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. मानवता धर्माचे अनुकरण करणे हीच राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Song Sets Guinness Record with Mass Student Singing!

Web Summary : Nagpur University's mass singing of 'Ya Bharat Bandhu Bhav' set a Guinness World Record and three others. Over 15,000 students participated in person, with more online. Nitin Gadkari emphasized the importance of humanity's message.
टॅग्स :nagpurनागपूर