शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

अबब ! नागपुरात अवतरला संत्र्यांचा ताजमहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 4:21 PM

नववर्षाच्या संध्येवर नागपुरात शनिवारपासून ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ची सुरुवात झाली आहे. सगळं नागपूर त्यासाठी सरसावलं आहे. यात भर पडली ती संत्र्यांनी तयार केलेल्या ताजमहालपासून ते आधुनिक शेतकऱ्याच्या सृजनात्मक प्रतिकृतींची.

ठळक मुद्दे२० ठिकाणी साकारलेल्या प्रतिकृती ठरल्या ‘सेल्फी पॉर्इंट’हत्ती, नाव, गांधीजींचा चष्मा, समुद्र मंथनाच्या प्रतिकृतीवर नागपूरकर मोहित

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपुरातील २० महत्त्वाचे चौक व सार्वजनिक स्थळी या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. जे.जे. कला महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम व ‘लोकमत’च्या पाठिंब्यातून सकारलेल्या या अद्भूत प्रतिकृतींवर नागपूरकर मोहित झाले आहेत.ताजमहाल साकारण्यासाठी लागली १२ हजार संत्रीरेशीमबाग परिसरातील सुरेश भट सभागृहाच्या दर्शनीस्थळी संत्र्यांनी साकारलेला भव्य ताजमहाल चर्चेचा विषय ठरला. तब्बल १२ हजार कृत्रिम संत्र्यांनी तयार केलेला हा ताजमहाल आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी येथे जणू स्पर्धाच लागली होती. जो तो या ताजमहालासोबत ‘सेल्फी’ काढत होता. ही प्रतिकृती जे.जे. कला महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी व्यंकटेश शिंदे याने साकारली. व्यंकटेश म्हणाला, पाच दिवसात ही प्रतिकृती उभारली. महाविद्यालयाचे प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विजय बोंधर, प्रा. यशवंत भाऊसार व प्रा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि माझे मित्र व महाविद्यालयाचे विद्यार्थी कृष्णा पंडित, सुनील निंगुळे, सुहास संकपाळ यांच्या मदतीने ती आणखी सुरेख झाली.हत्ती पाहण्यासाठी गर्दीसंत्र्यांचा हत्ती कसा असेल, हे पाण्यासाठी शनिवारी सकाळपासून ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कमध्ये चिमुकल्यांसह मोठ्यांनीही एकच गर्दी केली. १० फूट उंच व ६ फूट रुंद असलेला हा हत्ती जे.जे. कला महाविद्यालयाचा विद्यार्थी सुहास संकपाळ याने साकारला. लहान मुलांमध्ये सर्वाधिक आवडीचा प्राणी असलेला हत्ती साकारणे तसे अवघड होते. परंतु सुहासने हे अवघड काम लीलया पेलून सहज करून दाखविले. यात त्याला महाविद्यालयाचे प्राध्यापक व मित्रांनी मदत केली.गांधीजींचा चष्माही संत्र्यांचाजे.जे. कला महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी मुक्ता वैद्य हिने फुटाळा तलावाच्या चौपाटीवर साकारलेला महात्मा गांधींचा चष्मा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वच्छ भारत अभियानाचा प्रतीक असलेला हा चष्मा खऱ्याखुऱ्या संत्र्याने उभारला आहे. केवळ चष्म्याची गोल फ्रेम ही कृत्रिम संत्र्यांनी तयार केली आहे. मुक्ताचा हा पहिला प्रयत्न असलातरी या सुंदर कलाकृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.समुद्रमंथनातून निघाली संत्रीफुटाळा तलावाच्या चौपाटीशेजारी साकारलेला समुद्रमंथनाचा देखावा हा अप्रतिम असाच आहे. या मंथनातून बाहेर आलेली अमृतरुपी संत्री आहे. विशेष म्हणजे, दोर खेचणा ऱ्या माणसाची प्रतिकृती ही सुतळीच्या दोराने तयार केली आहे. १६ फूट रुंद आणि ५ फूट उंचीची ही प्रतिकृती कलाकाराच्या कल्पनेची उंच भरारी आहे. ही प्रतिकृती जे.जे. कला महाविद्यालयाचा विद्यार्थी चंद्रकांत हल्याळ याने साकारली आहे. प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेफुटाळा तलावावर संत्र्यांची नावफुटाळा तलावावर संत्र्यांची नाव असा सुरेख संगम जुळून आला आहे. जे.जे. कला महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रफुल रंगदाई याच्या अथक प्रयत्नातून ही नाव साकारण्यात आली आहे.खऱ्याखुऱ्या संत्र्यांनी साकारलेल्या या नावेची उंची १२ फूट आहे. दुरून ही प्रतिकृती पाहिल्यावर पाण्यावर संत्र्याची नाव तरंगत असल्याचा भास होतो. ही नाव म्हणजे सर्वांसाठी ‘सेल्फी पॉर्इंट’ ठरले आहे. सायंकाळच्या मावळत्या सूर्यप्रकाशात या नावेचे सौंदर्य आणखी खुलले होते.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरTaj Mahalताजमहाल