शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  मोबाईल शॉपी फोडून १६ लाखांचे मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 22:02 IST

जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

ठळक मुद्देधाडसी चोरीने व्यापाऱ्यात खळबळ : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.सुगतनगर रिंगरोडवर सुधीर हरिराम गुप्ता यांची शिवम मोबाईल शॉपी आहे. मंगळवारी रात्री १०.३० ला ती बंद करून गुप्ता घरी गेले. बुधवारी सकाळी त्यांची आई मोबाईल शॉपीजवळ गेली तेव्हा त्यांना तेथे चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी मोबाईल शॉपीचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि आतमधील १२० मोबाईल, लॅपटॉप तसेच सुधीर यांच्या भावाच्या बाजूलाच असलेल्या दुकानातूनही विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण १५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. बघ्यांची मोठी गर्दी गुप्ता बंधूंच्या दुकानांसमोर जमली. माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी अंधार करून ठेवल्याने सीसीटीव्हीत चोरट्यांची छायाचित्रे स्पष्ट आली नाहीत. परंतु चोरटे तीन असावेत, असा अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी ठसेतज्ज्ञांचे पथक घटनास्थळी बोलवून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.आधीच केली तयारीचोरट्यांनी दुकान फोडून चोरी करण्याची तयारी आधीच करून ठेवली असावी आणि त्यांना या मोबाईल शॉपीची तसेच परिसराची माहिती असावी, असा अंदाज आहे. चोरटे क्रेटा या आलीशान कारने आले होते. जेव्हा ते दुकानाबाहेर निघाले नेमक्या वेळी बाजुला राहणारा एक व्यक्ती तेथे आला. त्याला संशय आल्यामुळे त्याने चोरट्यांना टोकले असता आरोपी त्यांच्या कारमधून सुसाट वेगाने पळून गेले. संबंधित व्यक्तीने त्याच्या अ‍ॅक्टीव्हाने कारचा पाठलाग करून चोरट्याच्या वाहनाचा क्रमांक टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. दरम्यान, रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारचा नंबर आणि मार्ग शोधून चोरट्यांना पकडण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाtheftचोरी