शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

डबडबल्या डोळ्यांनी शहीद गोवारी बांधवांना नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:52 IST

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो गोवारी बांधवांनी त्या अमानवीय घटनेच्या स्मृतींना उजाळा देत न्यायाच्या लढाईत शहीद झालेल्या बांधवांना डबडबल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देहजारो गोवारी बांधव स्मारकावर जमा : सेवाभावी संस्थांनी दिली सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारच्या उपेक्षेचे बळी ठरलेल्या ११४ गोवारी बांधवांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त झिरो माईल चौकातील शहीद स्मारकाचा परिसर शनिवारी गोवारी बांधवांच्या गर्दीने भरला होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो गोवारी बांधवांनी त्या अमानवीय घटनेच्या स्मृतींना उजाळा देत न्यायाच्या लढाईत शहीद झालेल्या बांधवांना डबडबल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्या घटनेनंतर न्याय हक्काच्या लढाईला २५ वर्षे लोटल्यानंतरही बांधवांना न्यायाची प्रतीक्षा कायम असल्याची खंत त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. 

१९८५ चा काळा जीआर रद्द करावा आणि गोंडगोवारीच्या मध्ये केवळ ‘कॉमा’ टाकून समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी गोवारी बांधवांनी २३ नोव्हेंबर १९९४ ला हिवाळी अधिवेशनावर लाखोंचा मोर्चा काढला होता. सरकारचा कोणताही प्रतिनिधी भेटायला न आल्याने सायंकाळपर्यंत थांबलेल्या मोर्चात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधवांचे बळी गेले आणि असंख्य जखमी झाले. त्या बांधवांच्या लढ्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी हजारो गोवारी बांधव गोवारी शहीद स्मारकाजवळ जमा होतात. तसे ते यावर्षीही आले. सकाळपासून गावोगावच्या लोकांनी येथे भेट देत साश्रू नयनांनी शहीद बांधवांना आदरांजली वाहिली. यावर्षी २५ वा स्मृतीदिन असल्याने लोकांची संख्या वाढल्याचे दिसून आले. 
विविध सामाजिक, राजकीय संघटना, संस्थांचे कार्यकर्ते स्मृतीस्थळावर जमा झाले होते. यात महाविद्यालयीन तरुणांचा समावेश अधिक होता. धामणगाव रेल्वे परिसरातील गावांमधून आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाच्या माध्यमातून ५०० गोवारी बांधवांनी येथे भेट दिली. याशिवाय आदिवासी गोवारी युनिटी ट्रस्ट संघटनेशी जुळलेल्या गावोगावच्या विद्यार्थ्यांनी दुपारी ४ वाजता स्मारकाभोवती मानवी साखळी करीत मौन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भोजनदानासह पुस्तक व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन केंद्रासह २५ प्रकारचे स्टॉल स्मारक परिसरात लागले होते. सामाजिक संस्थांनीही यावेळी बांधवांना सेवा दिली.२५ वर्षापूर्वी झालेल्या मोर्चातील चेंगराचेंगरीतून सुखरुप बचावलेले, जखमी झालेले तसेच शहीद झालेल्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने शहीद गोवारी स्मारकावर उपस्थित झाले होते. प्रत्यक्ष त्या मोर्चाचे साक्षीदार असलेले, ज्यांनी आपल्या बांधवांच्या शवाचे थर पाहिले, त्या क्षणांची आठवण करीत अनेकांचा हुंदका दाटून येत होता. सायंकाळपर्यंत आदरांजली वाहण्याचा हा सिलसिला स्मारकावर चालला होता. दिवस मावळताच हे गोवारी बांधव आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

न्याय अद्याप बाकी असल्याची खंत २५ वर्षे लोटली तरी ज्या मागणीसाठी हे हत्याकांड झाले ती मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याची खंत श्रद्धांजलीसाठी आलेल्या बांधवांनी व्यक्त केली. राज्य सरकारने विशेष मागास प्रवर्गामध्ये ४० उच्च जाती टाकून गोवारी जमातीला मूळ आदिवासींपासून भटकविले. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बलांना, गोरगरिबांना कोणताच शासकीय लाभ होत नाही. घरकुल योजना, बेरोजगारांना बँक कर्ज, नोकरीमध्ये तसेच स्पर्धा परीक्षांकरिता शासकीय सवलत मिळत नाही. त्यामुळे समाजातील विद्यार्थी, युवक बेरोजगारांची थट्टा केली जात असल्याचा समाजाचा आरोप आहे. गोवारी जमातीला एससी किंवा एसटीप्रमाणे कोणत्याही प्रकारची शासकीय योजना नाही. त्यामुळे गोवारी जमात ही सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासापासून कोसो दूर असल्याची समाजाची भावना आहे. गोंडगोवारी ही बोली भाषा आहे. ‘गोंड’ व ‘गोवारी’ वेगळ्या जमाती आहेत. २००२ पर्यंत गोंड-राजगोंड अशी अनुसूचीमध्ये नोंद होती. राज्य शासनाने शिफारस करून लोकसभेत दुरुस्ती विधेयक आणले. गोंड-राजगोंडमध्ये कॉमा टाकला. त्याप्रमाणे ‘गोंडगोवारी’ मध्येही कॉमा टाकण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी, अशी समाजाची मागणी आहे. जोवर ही दुरुस्ती होणार नाही, तोवर समाजाला न्याय मिळणार नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूर