चिंताजनक! १६८० बाधित, २६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:44+5:302021-04-11T04:08:44+5:30

सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक/ कामठी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ...

Worrying! 1680 affected, 26 killed | चिंताजनक! १६८० बाधित, २६ मृत्यू

चिंताजनक! १६८० बाधित, २६ मृत्यू

सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक/ कामठी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी तेरा तालुक्यात १६८० रुग्णांची नोंद झाली. २६ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १२३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ६३ हजार १९२ नागरिक संक्रमित झाले आहे. शनिवारी ग्रामीण भागात १०१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ग्रामीण भागात उपचारांती बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४४ हजार १३ इतकी झाली आहे. सध्या १७,३८७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हिंगणा तालुक्यात १३५६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २११ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात सर्वाधिक ९७ रुग्णांची नोंद वानाडोंगरी न.प.क्षेत्रात झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७,७६५ झाली आहे. यातील ५,४९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काटोल तालुक्यात ८४५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २१६ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ११६ तर ग्रामीण भागातील १०० रुग्णांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात २४१ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ३६ तर ग्रामीण भागातील २०५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात सर्वाधिक २२ रुग्णांची नोंद मोहपा न.प.क्षेत्रात झाली. उमरेड तालुक्यात ८६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ५५ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. रामटेक तालुक्यात २३० रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील ३४ तर शहरातील १९६ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २८३९ इतकी झाली आहे. यातील १५४० रुग्ण बरे झाले आहेत तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कुही तालुक्यात ३८९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १०५ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधिक मांढळ येथे ४६, वेलतूर (३४) कुही व साळवा येथे प्रत्येकी ११ तर तितूर येथे तीन नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.

नरखेड ग्रामीणमध्ये स्थिती बिघडली

नरखेड तालुक्यात शनिवारी १७३ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील २६ तर ग्रामीण भागातील १४७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७८१ तर शहरात १३२ इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत ७८, जलालखेडा (३३), मोवाड (३४) तर मेंढला येथे दोन रुग्णांची नोंद झाली.

Web Title: Worrying! 1680 affected, 26 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.