शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक स्ट्रोक दिवस; दर मिनिटाला सहा व्यक्तींना होतो ब्रेन स्ट्रोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 11:21 IST

भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो.

ठळक मुद्देडॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची माहिती२० टक्के व्यक्तींचे वय ४० वर्षांपेक्षा कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा उल्लेख फार कमी होतो. परंतु, हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो. हा आकडा एक वर्षात सुमारे २० लाखापर्यंत पोहोचतो व त्यापैकी जवळपास ७ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील ब्रेन स्ट्रोकग्रस्त नागरिकांपैकी २० टक्के नागरिकांचे वय ४० वर्षापेक्षा कमी आहे.जागतिक न्यूरोलॉजी महासंघाच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी जागतिक स्ट्रोक दिवसानिमित्त ही माहिती दिली. गेल्या २५ वर्षात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. जगात प्रत्येक दोन सेकंदात एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होतो. त्यातील ८० टक्के व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटातील असतात. ब्रेन स्ट्रोक कोणत्याही वयात व कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो, पण ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. स्ट्रोक झाल्यानंतर ३० टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो तर, ३० टक्के व्यक्तींना दीर्घकालीन अपंगत्व येते. उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, उच्च कोलेस्ट्रॉल, चुकीची आहार पद्धती, मद्यप्राशन, हृदयरोग, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कारणे टाळल्यास ब्रेन स्ट्रोकला लांब ठेवता येऊ शकते. रोज एक तास चालल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो अशी माहितीही मेश्राम यांनी दिली.

एड्सपेक्षा जास्त मृत्यू स्ट्रोकनेएड्स, टीबी व मलेरिया यापेक्षा जास्त मृत्यू ब्रेन स्ट्रोकमुळे होतात. ग्रामीण भारतात ब्रेन स्ट्रोक हा मृत्यूचे सामान्य कारण झाला आहे. मेंदूला आॅक्सिजन व जीवनसत्वाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या गोठलेल्या रक्तामुळे बुजल्या किंवा फुटल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होतो. ८० टक्के ब्रेन स्ट्रोक रक्तवाहिन्या बुजल्यामुळे तर, २० टक्के ब्रेन स्ट्रोक रक्तवाहिन्या फुटल्यामुळे होतात.

ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचाचेहरा अचानक गळल्यासारखा होणे, अवयवांत अशक्तपणा जाणवणे, बोलण्यात बदल होणे, चालण्यात अडचण येणे व दृष्टी कमी होणे ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणे आहेत. सध्या ब्रेन स्ट्रोकवर अनेक आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी उपचार केल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका टळला जाऊ शकतो.

अपंगत्व आणण्यात पहिल्या क्रमांकावरबे्रन स्ट्रोक हा आजार व्यक्तीला अपंगत्व आणणाºया आजारांमध्ये पहिल्या तर, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाºया आजारांमध्ये दुसºया क्रमांकावर आहे. बे्रन स्ट्रोक झाल्यानंतर वाचलेले ८ कोटी व्यक्ती जगात आहेत. त्यापैकी ५ कोटी व्यक्तींना अपंगत्व आले आहे. यावर्षी १ कोटी ४५ लाख व्यक्तींना स्ट्रोक आला. त्यापैकी ५५ लाख व्यक्तींचा मृत्यू झाला असे जागतिक स्ट्रोक संघाचे अध्यक्ष प्रा. मायकेल ब्रेनिन यांनी जागतिक न्यूरोलॉजी परिषदेत बोलताना सांगितले. ही परिषद दुबई येथे झाली. दरम्यान, ब्रेनिन, डॉ. मेश्राम व जागतिक न्यूरोलॉजी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. ºयुजी काझी यांनी ब्रेन स्ट्रोकवर सविस्तर चर्चा केली. प्रा. काझी यांनी स्ट्रोकचा धोका सतत वाढत असून सध्या ४ पैकी १ व्यक्तीला स्ट्रोक येत आहे अशी माहिती दिली.

टॅग्स :Healthआरोग्य