लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वानदंशामुळे ‘रेबीज’च्या ज्या केसेस भारतात आढळतात, त्यातील ९७ टक्के पिसाळलेल्या कुत्र्यापासून उद्भवलेल्या असतात. जगात दरवर्षी रेबीजमुळे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास ३० हजार लोक एकट्या भारतात मृत्यू पावतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून देशात दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू होतो. यात १५ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वात जास्त आहे.रेबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार कुत्र्यांपासून, जंगली कोल्ह्यांपासून, वटवाघुळापासून चावा घेतल्याने होतो. ‘रेबीज’चे दुसरे नाव मृत्यू आहे. आजारापूर्वी श्वानदंशानंतर संपूर्ण प्रतिबंधक लसीकरण व जखमेवर उपाययोजना हाच जीवनाचा आधार आहे. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रु ग्णालयात नि:शुल्क लस उपलब्ध आहे, मात्र कुठल्याही पशु चिकित्सालयात ही सोय उपलब्ध नाही. हा रोग होऊ नये म्हणून श्वानाकरिता नि:शुल्क नियमित लसीकरण अपेक्षित आहे. परंतु ही सोय उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरातील, गावातील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही हे वास्तव असले तरी या दिशेने संशोधन व जनजागृती करून या समस्येवर मात केली जाऊ शकते, असे तज्ज्ञाचे मत आहे.नि:शुल्क लसीकरणासाठी संस्थांचा पुढाकारपशुधन विकास अधिकारी डॉ. अजय पोहरकर यांनी सांगितले, पशु सर्वचिकित्सालय नागपूर व नावार संस्था आणि ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि.’ या संस्थांच्या सहभागाने पाळीव प्राण्याकरिता ‘अॅण्टी रेबीज’ लसीकरणाची नि:शुल्क सोय उपलब्ध केली आहे. तसेच सरकारने नागपुरात ‘वन हेल्थ इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.लक्षणे केव्हा दिसतील याचा नेम नाहीश्वानदंश झाल्यानंतर त्याची लक्षणे केव्हा दिसून येतील याचा नेम राहत नाही. पहिल्या काही दिवसात किंवा एक वर्षांनंतरही ही लक्षणे दिसून येऊ शकतात. दंश झालेल्या जागेवर पुरळ येणे, खाज सुटणे, झिणझिण्या येणे, ताप येऊन डोके दुखणे, स्रायू दुखणे, यात रोग्याला प्रकाशाची व पाण्याची भीती वाटणे ही काही प्राथमिक लक्षणे आहेत.दंश होताच डॉक्टरांशी संपर्क साधा
जागतिक रेबीज दिन :दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 22:05 IST
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून देशात दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू होतो. यात १५ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वात जास्त आहे.
जागतिक रेबीज दिन :दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू
ठळक मुद्देभारतात दरवर्षी ३० हजार लोक मृत्यूच्या दारात : जीवघेण्या आजारावर जनजागृती आवश्यक