शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

जागतिक लोकसंख्या दिन; नागपूरच्या लोकसंख्येत ३६ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 10:40 IST

मिहान, मेट्रोसारख्या प्रकल्पांच्या प्रचारामुळे रोजगाराच्या शोधात उपराजधानीकडे बाहेरील नागरिकांचा ओढा वाढला आहे. रोजगार आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने इकडे धाव घेणाऱ्या स्थलांतरितांची संख्याही वाढत आहे.

ठळक मुद्देविकासाच्या वेगावर स्थलांतरितांचा भारस्थानिक संस्थांचे नियोजन गडबडले

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात केंद्रित होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासह शैक्षणिक सुविधांचीही वाढ होत असते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कल नेहमीच शहराकडे असतो. नागपूर शहर सध्या देशाच्या व राज्याच्या सत्तेचा केंद्र्रबिंदू आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या विकासाला गती मिळाली आहे.मिहान, मेट्रोसारख्या प्रकल्पांच्या प्रचारामुळे रोजगाराच्या शोधात उपराजधानीकडे बाहेरील नागरिकांचा ओढा वाढला आहे. नागपूर हे राज्यातील एक मोठे शहर असून, रोजगार आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने इकडे धाव घेणाऱ्या स्थलांतरितांची संख्याही वाढत आहे. गेल्या काही वर्षांत ही वाढ अधिक गतीने होत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियोजन गडबडले आहे.२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३६.७३ टक्के नागरिक बाहेरील (स्थलांतरित) आढळून आले आहेत. २०२१ पर्यंत यात अंदाजे ५ ते १० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. स्थलांतरित नागरिकांत परप्रांतीय किती याबाबत ठोस आकडेवारी नसली तरी चारही बाजूने वाढण्याची क्षमता असल्याने उपराजधानी फुगू लागली आहे व त्यानुसार सोईसुविधांचे नियोजन महापालिकासारख्या संस्थांसाठी अडचणीचे ठरत आहे.२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ४६ लाख ५३ हजार ५७० इतक्या लोकसंख्येची नोंद करण्यात आली होती. यात २३ लाख ८४ हजार ९७५ पुरुष आणि २२ लाख ६८ हजार ५९५ महिलांचा समावेश होता. मात्र जनगणना करीत असताना नागपूर जिल्ह्यात १४ लाख ९३ हजार ९१४ लोकसंख्या ही बाहेरील (इतर जिल्ह्यातील वा इतर राज्यातील) आढळून आली आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ३६.७३ टक्के इतके आहे. स्थलांतराची आकडेवारी लक्षात घेता स्थानिक नागपूरकरांना याचा फटका निश्चितच बसणार आहे. तो बसतोही आहे. नागपूर जिल्ह्यात कमी पल्ल्याचे अंतर गाठून स्थलांतरण करणाऱ्यांचे प्रमाण ४ लाख ५० हजार ७६६ इतके आहे. शहरीकरणाची आस आणि पोटाची भूक ही दोन प्रमुख कारणे वाढत्या स्थलांतरणामागे आहे.

भविष्यात लोंढे आणखी वाढणारकेंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील वजनदार मंत्री नितीन गडकरी हे दोघेही नागपूरचे असल्याने सत्ता केंद्र नागपूर बनले आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प नागपुरात येत आहेत. मिहान प्रकल्प, आयआयएम, आयआयटी, एम्स, नॅशनल लॉ स्कूल आदी महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था येत आहेत. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाºया संधी लक्षात घेता, येत्या काही वर्षांत नागपुरात बाहेरून येणाºयांची संख्या कधी नव्हे इतक्या झपाट्याने वाढण्याची शक्यता बळावली आहे.

१०० वर्षात चढउतार१९११ ते १९७१ आणि २००१ ते २०११ या कार्यकाळात नागपूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीच्या दरात चढउतार पाहायला मिळतो. १९०१ ते १९११ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ७.७२ टक्के इतका होता. पुढच्याच दशकात म्हणजे १९११ ते १९२१ या काळात तो कमी होऊन २.०३ टक्केपर्यंत खाली आला. त्यानंतर १९२१ ते ३१ या दशकात त्यात पुन्हा वाढ होऊन १८.६९ टक्के झाला. १९३१-४१ या दशकात पुन्हा कमी होऊन १२.७६ टक्के झाला. १९४१ ते १९५१ या दशकात पुन्हा १६.७६ टक्के वाढला. १९५१ ते १९८१ या काळात लोकसंख्या वाढीचा आलेख चढताच राहिला. १९८१ मध्ये ३३.२६ टक्के वाढ नोंदविण्यात आली. १९८१ ते १९९१ या दशकात पुन्हा घट झाली. तेव्हा २६.९७ टक्के लोकसंख्या वाढीचा दर नोंदविला गेला. १९९१ ते २००१ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर २३.७४ टक्के होता. तो २००१ ते २०११ मध्ये १४.३९ टक्के झाला. २०११ पासून तो पुन्हा वाढल्याचे दिसून येत असून येणाºया काळात हे प्रमाण अधिक फोफावणार असल्याची शक्यता तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जात आहे.

शहराचा ओढा, गावे ओस२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार ५७० इतकी आहे. यातील ३१ लाख ७८ हजार ७५९ नागरिक शहरात, तर १४ लाख ७४ हजार ८११ नागरिक ग्रामीण भागात राहतात. शहरी नागरीकरणाची २००१ ते २०११ या वर्षातील ही वाढ २१.६२ टक्के इतकी आहे. १९९१-२००१ च्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरीकरणाचे प्रमाण २८.७० इतके आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढीचा विचार करता हे प्रमाण केवळ १.४५ टक्के आहे. त्यामुळे शहराकडे नागरिकांचा जास्त ओढा असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

हिंगणा, कामठीत अधिक घनताहिंगणा आणि कामठी हे दोन तालुके शहरालगत वसले आहेत; शिवाय औद्योगिकीकरणही या भागात होत आहे. त्यामुळे या परिसरातही शहरीकरणाचे प्रमाण अधिक वाढले आहे. या भागात जागांचे दर परवडण्यासारखे आहेत. शिवाय शहरालगत असल्याने या भागात राहण्याबाबत स्थलांतरित नागरिकांचा अधिक कल अहवालावरील आकडेवारीतून दिसून येतो. जिल्ह्यातील १४ ब्लॉकची आकडेवारी विचारात घेता हिंगणा तालुक्यात (५०.०२ टक्के), कामठीत (५९.७७ टक्के) आणि नागपूर ग्रामीणमध्ये १०० टक्के शहरीकरण झाले आहे.

टॅग्स :Metroमेट्रो