शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

जागतिक पक्षाघात दिन : दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात : चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 20:20 IST

भारतात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात साधारण २० लाख लोकांना पक्षाघात होतो. यातील सात लाख लोकांचा मृत्यू होतो. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्या देशात ज्यांना पक्षाघात होतो, त्यापैकी २० टक्के रुग्ण हे ४० पेक्षा कमी वयोगटातील असतात, अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

ठळक मुद्देदरवर्षी सात लाख लोकांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात साधारण २० लाख लोकांना पक्षाघात होतो. यातील सात लाख लोकांचा मृत्यू होतो. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्या देशात ज्यांना पक्षाघात होतो, त्यापैकी २० टक्के रुग्ण हे ४० पेक्षा कमी वयोगटातील असतात, अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.जागतिक पक्षाघात दिनाच्यानिमित्ताने डॉ. मेश्राम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जागतिक पक्षाघात संघटनेचे अध्यक्ष डॉ. मायकल ब्रेनीन यांच्यानुसार जगात दरवर्षी आठ कोटी लोकांना पक्षाघात होतो. त्यापैकी पाच कोटी लोकांना कायम स्वरूपाचे अपंगत्व येते. यामुळे पक्षाघात झाल्यानंतर आयुष्य किती चांगले करता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मृत्यू व अपंगत्व येण्यामध्ये पक्षाघात हे दुसरे कारण ठरले आहे. जगात दर दोन सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ७० लाख लोकांना पक्षाघात होतो. आणि त्यापैकी सात लाख लोक बळी पडतात. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात.

तरुणांत पक्षाघाताचे १५ टक्के प्रमाण‘सेरेब्रल विनस थॅम्ब्रोसीस’मुळे पक्षाघाताचे प्रमाण तरुणांमध्ये साधारण १५ टक्के आहे. पक्षाघात झालेले ३० टक्के लोक मृत्युमुखी पडतात, तर ३० टक्के लोकांमध्ये अपंगत्व येते. जंकफूड खाणे, मद्यपान करणे, व्यायाम न करणे, तणावात राहणे, यामुळे भारतात पक्षाघाताचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले.

उच्च रक्तदाबामुळे वाढते पक्षाघाताची शक्यता९० टक्के लोकांमध्ये पक्षाघात हा उच्च रक्तदाबामुळे होतो. धूम्रपान, मधुमेह, उच्चरक्तदाब, मद्यपान, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, हृदयविकार, चुकीचा आहार, जीवनसत्व बी-१२ची कमी, आणि प्रदूषण पक्षाघाताला कारणीभूत ठरते. ज्यांना रक्तदाब जास्त आहे त्यांची चार ते सहा पटीने पक्षाघाताची शक्यता वाढते.

पक्षाघाताच्या ८० टक्के रुग्णांमध्ये रक्तवाहिनी बंद होतेडॉ. मेश्राम म्हणाले, पक्षाघातामध्ये साधारण ८० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी बंद होते व मेंदूच्या काही भागात रक्तप्रवाह आणि आॅक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मेंदूच्या पेशी निष्क्रिय होतात. तर २० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी फाटते, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रेन हॅमरेज’ असे म्हणतात.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर