शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : भारतीय पदार्थ नव्या रूपात जगासमोर सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 21:52 IST

लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सोमवारचा दिवस पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अगदीच स्पेशल ठरला. हॉटेलिंग आणि हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट शेफ गौतम मेहरिषी यांनी मार्गदर्शन केले. ही काही रेस नाही, ही मॅरेथान आहे जेथे सातत्याने शिकत जावे लागते. खाद्यपदार्थाच्या बाबतीत व्यक्ती तितक्या आवडी आहेत. त्यामुळे थाळीत अन्न सजविताना आधी अन्नातील भावनिकता समजून घ्यावी लागते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ठळक मुद्देगौतम मेहरिषी यांनी दिला व्यंजन स्वादाचा कानमंत्र : पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सोमवारचा दिवस पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अगदीच स्पेशल ठरला. हॉटेलिंग आणि हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट शेफ गौतम मेहरिषी यांनी मार्गदर्शन केले. ही काही रेस नाही, ही मॅरेथान आहे जेथे सातत्याने शिकत जावे लागते. खाद्यपदार्थाच्या बाबतीत व्यक्ती तितक्या आवडी आहेत. त्यामुळे थाळीत अन्न सजविताना आधी अन्नातील भावनिकता समजून घ्यावी लागते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात ‘पार्टिसिपेशन विथ शेफ गौतम मेहरिषी’ या मार्गदर्शनपर कुकरी शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी मेहरिषी यांनी विविध रेसीपी समजाविण्यासह या क्षेत्रात यशस्वी होण्याचा मंत्रही दिला. शासकीय हॉटेल मॅनेजमेंट संस्था, तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटसह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते. यावेळी मुंबईचे शेफ योगेश उटकर व नागपूरच्या अपर्णा कोलारकर यांचे खास सहकार्य होते. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे निमित्त असल्याने अर्थातच संत्रा हा केंद्रस्थानी होता. मेहरिषी यांनी ऑरेंज व मसूर डाळीचे मिश्रण असलेला पदार्थ तसेच ऑरेंज चिल्ड सलाद हा पदार्थ त्यांच्या खास शैलीद्वारे तयार करून दाखविला. विविध पदार्थ तयार करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला मनोरंजनात्मक व माहितीपूर्ण संवाद खास ठरला. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर किंवा व्यवसायाचा विचार करताना नफा आणि तोट्याचा विचार करू नका. या क्षेत्राचा विचार करताना तरुणांना पाश्चिमात्य व कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचे आकर्षण असते. मात्र भारतात पदार्थांची समृद्ध परंपरा आहे, जी सर्वत्र पसरली आहे. विद्यार्थ्यांनी जागोजागच्या भारतीय रेसीपी जाणून घ्याव्या, आईच्या-आजीच्या रेसीपी समजून नव्या रूपात जगासमोर सादर केल्यास तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.फेस्टिव्हलअंतर्गत संत्र्याच्या थीमवर पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांची त्यांच्याच महाविद्यालयात स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ऑरेंज कोल्ड कॉफी, ऑरेंज मंचुरियन, ऑरेंज रेसोटो, ऑरेंज फ्राईड राईस, ऑरेंज गुलाबजाम, ऑरेंज मटर पनीर, ऑरेंज संदेश अशा नानाप्रकारच्या रेसीपी तयार करून सादर केल्या.प्रत्येक महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांच्या व्यंजनांचे प्रदर्शन सोमवारी भरविण्यात आले. यातील सर्वोत्तम रेसीपी सादर करणाऱ्या तीन स्पर्धकांची गौतम मेहरिषी यांनी निवड केली व त्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही वितरीत करण्यात आले.हे आहेत विजेतेप्रथम : संजय वर्मा, तुली कॉलेजद्वितीय : अंकुश वर्मा, तुली कॉलेजतृतीय : अफराज रंगवाला, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर