शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भाऊबीजेच्या दिवशी भावाने सोडले जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:43 IST

सावनेर शहराला अपघाताचे ग्रहण लागले की काय, असे वाटायला लागले आहे. कारण, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (बुधवार, दि. ७) सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. त्यातच भाऊबीजेच्या दिवशी (शुक्रवार, दि. ९) रात्री सावनेर शहरात झालेल्या अपघातात ओवाळणीपूर्वीच भावाला जग सोडावे लागले. विशेष म्हणजे, भाऊ काम आटोपून त्याच्या मित्रासोबत घरी जात असतानाच मेटॅडोरने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना तेलगाव शिवारात रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी : मेटॅडोरची दुचाकीला धडकनागपूर जिल्ह्याच्या सावनेर येथील दुर्दैवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : सावनेर शहराला अपघाताचे ग्रहण लागले की काय, असे वाटायला लागले आहे. कारण, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (बुधवार, दि. ७) सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. त्यातच भाऊबीजेच्या दिवशी (शुक्रवार, दि. ९) रात्री सावनेर शहरात झालेल्या अपघातात ओवाळणीपूर्वीच भावाला जग सोडावे लागले. विशेष म्हणजे, भाऊ काम आटोपून त्याच्या मित्रासोबत घरी जात असतानाच मेटॅडोरने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना तेलगाव शिवारात रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.नितीन रवींद्र बोरकर (२२) असे दुर्दैवी मृत भावाचे नाव असून, शुभम दिलीप गजभिये (२०), दोघेही रा. तिष्टी (खुर्द), ता. सावनेर असे गंभीर जखमीचे नाव आहे. नितीनने काही दिवसांपूर्वीच महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला सुरुवात केली होती. तो रोज सावनेरहून तिष्टी (खुर्द)ला मोटरसायकलने ये-जा करायचा. आज (दि. ९) भाऊबीज असल्याने तसेच त्याची मोठी बहीण ओवाळणीसाठी घरी प्रतीक्षा करीत असल्याने तो रात्री ७ वाजताच्या सुमारास शुभमसोबत मोटरसायकलने गावाला जायला निघाला. ते तेलगावजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-३१/एफसी-२६१५ क्रमांकाच्या मेटॅडोरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, नितीनचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी लगेच पोलिसांना सूचना देत दोघांनाही सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे शुभमवर प्रथमोपचार करून त्याला नागपूरला उपचारासाठी रवाना करण्यात आले. या घटनेमुळे तिष्टी (खुर्द) येथे शोककळा पसरली. या प्रकरणी केळवद (ता. सावनेर) पोलिसांनी मेटॅडोरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू