शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

जागतिक वन दिवस; ग्रीन कव्हर; विदर्भात घटले, राज्यात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 07:00 IST

Nagpur news वनसंपदेची भिस्त असलेल्या विदर्भातील वनक्षेत्र जवळपास १४६ चौरस किलोमीटरने घटल्याची नोंद स्टेट फॉरेस्ट सर्व्हेच्या २०१९च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्टेट फॉरेस्ट सर्वेक्षणचा अहवाल पण वनसंपदेची भिस्त विदर्भावरच

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात वनसंपदेच्या संवर्धनासाठी सकारात्मक प्रयत्न होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील ग्रीन कव्हरमध्ये ९७५ चौरस किलोमीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ ओपन फॉरेस्टमध्ये झाली आहे. संरक्षित वनक्षेत्र मात्र घटले असल्याचे दिसते. त्यातही वनसंपदेची भिस्त असलेल्या विदर्भातील वनक्षेत्र जवळपास १४६ चौरस किलोमीटरने घटल्याची नोंद स्टेट फॉरेस्ट सर्व्हेच्या २०१९च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत किमान २५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वनक्षेत्र असणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यातील वनक्षेत्र अद्यापही क्षेत्रफळाच्या तुलनेत केवळ २० टक्के आहे. उल्लेखनीय म्हणजे २००९पासून १० वर्षांच्या आकडेवारीनुसार अत्यंत घनदाट व मध्यम घनदाट जंगलाच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात आली आहे. वृक्षारोपणाच्या मोहिमेमुळे नागरी भागात ग्रीन कव्हर वाढले असले, तरी जंगलातील ग्रीन कव्हर कमी झाल्याचे दिसून येते. धक्कादायक म्हणजे विदर्भातील वनक्षेत्रात घट झालेली आहे. त्यातही गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात झालेली कमतरता चिंतेची बाब आहे.

गडचिरोलीत सर्वाधिक घटले जंगल

जिल्हा            भूभाग एकूण वनक्षेत्र तफावत

गडचिरोली १४४१२            ९९१६.९४            - ८७.०६

चंद्रपूर ११४४३            ४०५४.४६ - ३२.५४

नागपूर ९८९२             २०००.३८ - १८.६२

भंडारा ४०८७             ९९८.९२ - ७.०८

बुलडाणा ९६६१             ५९१.६०            - ३.४०

वाशिम ४९०१             २९६.७०            - २.२४

याशिवाय अमरावती व वर्धामध्ये साधारण घट झाली आहे. मात्र, गोंदियामध्ये १५.५९ चौरस किलोमीटर, अकोलामध्ये १.३७ चौरस किलोमीटर व यवतमाळमध्ये १.३२ चौरस किलोमीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे.

१० वर्षांची तुलना (महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौरस किलोमीटर)

वर्ष             वनक्षेत्र (चौरस किलोमीटर)

२००९             ५०,६५०

२०११             ५०,६४६

२०१५             ५०,६२८

२०१७             ५०,६०४

२०१९             ५०,७७७.५६

राज्यातील वनक्षेत्राबाबत महत्त्वाचे बिंदू

- झुडपी जंगल धरून ६१,५७९ चाै.किमी. वनक्षेत्र. ८० टक्के आरक्षित, १० टक्के संरक्षित वनक्षेत्र.

- १६१३९ चाै.किमी. नाेंदणीकृत जंगलाबाहेरील वनक्षेत्र.

- १७० प्रजातीचे वृक्ष, १३५ प्रजातीची झुडपे व ५४ प्रजातीच्या औषधी वनस्पती आहेत.

- २९,९४७ हेक्टरमध्ये ६८६ नैसर्गिक जलस्त्राेत. ७३,०६२ हेक्टरमध्ये ४२५७ मानवनिर्मित पानवठे.

- ५६,३७,३९२ हेक्टर वनक्षेत्रात २.०७ टक्के जलस्त्राेत.

- २६०४४ हेक्टर म्हणजे ३९ टक्के वनक्षेत्र अति, तीव्र व मध्यम वणवा प्रवण क्षेत्र.

- २६५१५ चाै.किमी. एकूण हिरवळ क्षेत्र बांबू लागवडीने व्यापले आहे, जे ९.५५ टक्के आहे.

- ९५.३९ लाख टन जळाऊ लाकूड, १५.७१ काेटी टन चारा, १.२८ लाख टन बांबू, ८.६२ लाख टन इतर उपयाेगी लाकडे वनक्षेत्रामधून जवळचे ग्रामस्थ उपयाेगात आणत असतात.

टॅग्स :forestजंगल