शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

नागपूर विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल; राज्य शासनाने दिली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 21:22 IST

महाराष्ट्र सरकारने ४४ कोटी ४१ लाख ३८ हजार रुपये इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे.

-आनंद डेकाटे 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल साकारले जाणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता महाराष्ट्र सरकारने ४४ कोटी ४१ लाख ३८ हजार रुपये इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याचे प्रस्तावित करीत संकुलाच्या बांधकामासाठी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली होती. या कामाची तांत्रिक पडताळणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची किंमत निश्चित केली. त्यानंतर उच्चस्तरीय समितीने याकरिता ४४ कोटी ४१ लाख ३८ हजार इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास चक्रीय पद्धतीने मान्यता दिली आहे.

आंतरक्रीडा संकुलात अशा असतील 

सुविधा आंतर क्रीडा संकुलामध्ये इनडोअर बास्केटबॉल, इनडोअर हँडबॉल, जिम्नॅस्टिक एरिना, रेसलिंग एरिना, फेन्सिंग एरिना, ज्युडो, कराटे, इनडोअर कबड्डी, खो-खो, क्वॅश आदी विविध खेळांच्या सुविधा राहणार आहे. या सोबतच ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, रेन, रूप वॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर आणि स्पेशलाईज इक्विपमेंट, फायर फायटिंग अरेंजमेंट, कंपाउंड वॉल इंटरनल रोड, डेव्हलपमेंट ऑफ ग्राउंड, पार्किंग, लँडस्केपिंग अँड गार्डनिंग, लिफ्ट, एअर कंडिशनिंग, ट्रान्सफॉर्मर, सीसीटीव्ही आधी विविध सुविधा या आंतर क्रीडा संकुलामध्ये राहणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जागतिक दर्जाचे आंतरक्रीडा संकुल उभारणीला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल होणारे नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्रातील प्रथमच विद्यापीठ ठरणार आहे. खेळाडूंना जागतिक दर्जाचे सुविधा युक्त क्रीडा संकुल उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो.- डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार