शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जागतिक सेलेब्रल पाल्सी दिवस; ‘त्या’ पंखांना मिळणार स्वावलंबनाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 10:47 IST

सेरेब्रल पाल्सी अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जगात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक हजार बालक सेलेब्रल पाल्सीचे असतात. यावर उपचार नाही. मात्र, ‘फिजिओथेरपी’, ‘आॅक्युपेशनल थेरपी’ व ‘स्पीच थेरपी’ने यांचे जीवन सुसह्य करता येते. 

ठळक मुद्देसेलेब्रल पाल्सी गरजू बालकांना ‘मोफत फिजिओथेरपी’नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेरेब्रल पाल्सी अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जगात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक हजार बालक सेलेब्रल पाल्सीचे असतात. यावर उपचार नाही. मात्र, ‘फिजिओथेरपी’, ‘आॅक्युपेशनल थेरपी’ व ‘स्पीच थेरपी’ने यांचे जीवन सुसह्य करता येते. परंतु अनेक गरजू व गरिबांना ही महागडी उपचार पद्धत परडवत नाही. यामुळे अपंगत्वात वाढ होऊन ही मुले आयुष्यभर दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. यांना किमान स्वत:ची कामे स्वत: करता यावी, त्यांच्यात स्वावलंबन पेरण्यासाठी एका बालअस्थिरोग तज्ज्ञाने ‘मोफत फिजिओथेरपी’ सेंटर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. डॉ. विराज शिंगाडे त्या डॉक्टरांचे नाव.गर्भधारणेच्या कालावधीत आईला ‘इन्फेक्शन’ झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थॉयरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळेआधीच प्रसुती झाल्यास, फार कमी वजनाचे बाळ असल्यास व इतरही काही कारणांमुळे जन्माला येणारे बाळ हे ‘सेरेब्रल पाल्सी’ राहू शकते. विशेष म्हणजे, अलीकडे अयोग्य जीवनशैलीमुळे ही लक्षणे बºयाच महिलांमध्ये दिसून येऊ लागली आहे.गेल्या पाच वर्षांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतात २५ लाख लोकं सेरेब्रल पाल्सीने पीडित आहे. सेरेब्रल पाल्सीमध्ये लवकर उपचार सुरू होणे अत्यंत फायद्याचे ठरते. कारण बालवयात मेंदूची लवचिकता व शिकण्याची क्षमता फार चांगली असल्यामुळे त्याचा फायदा होतो. परंतु गरीब व गरजू मुले महागड्या उपचारांपासून वंचित राहतात, त्यांना कष्टमय जीवन व्यतीत करावे लागते. अशा मुलांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी, नि:शुल्क ‘फिजिओथेरपी’च्या मदतीने या मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ. शिंगाडे यांनी नागाई नारायण स्मृती फाऊंंडेशनतर्फे हे स्तुत्य कार्य हाती घेतले आहे. अजनी चौकात ‘प्रवरा हॉस्पिटल’मध्ये २० मुलांवरील मोफत उपचारातून सुरुवात झाली आहे.

त्यांना स्वबळ देण्याचा प्रयत्नगडचिरोलीपासून तर धारणी, मेळघाटातील गरीब व गरजू मुले जी न्यूरॉलॉजिकल कमकुवत व अस्थिव्यंगाच्या व्याधीने ग्रस्त आहेत, त्यांना मोफत औषधोपचार करून त्यांचे अपंगत्व दूर करणे व त्यांनी कुणावरही अवलंबून न राहता इतर सामान्य मुलांसारखे जीवन जगण्यास समर्थ करणे हा नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्याच धर्तीवर आता मोफत फिजिओथेरपी सुरू करून या मुलांंना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न आहे.-डॉ. विराज शिंगाडे, बालअस्थिरोगतज्ज्ञ, नागपूर.

टॅग्स :Healthआरोग्य