जागतिक बँकेचे प्रतिनिधी २९ ऑगस्टला नागपुरात; विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

By आनंद डेकाटे | Published: August 23, 2023 04:58 PM2023-08-23T16:58:46+5:302023-08-23T16:59:53+5:30

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

World Bank representative in Nagpur on August 29; Communicate with Divisional Commissioner and District Collector | जागतिक बँकेचे प्रतिनिधी २९ ऑगस्टला नागपुरात; विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

जागतिक बँकेचे प्रतिनिधी २९ ऑगस्टला नागपुरात; विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

googlenewsNext

नागपूर : जागतिक बँकेचे प्रतिनिधी राज्याच्या भेटीवर येत असून येत्या २९ ऑगस्ट रोजी ते नागपूरला भेट देणार आहेत. यादरम्यान ते विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. जागतिक बँकेच्या प्रतिनिधी सोबत होणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपापल्या आस्थापनांची योग्य माहिती सादर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) या उपक्रमात समन्वयकाची भूमिका निभावत असून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्याची माहिती संकलित केली जात आहे. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आस्थापनांनी आपापली योग्य माहिती आयआयएमने दिलेल्या आराखड्यामध्ये भरून तातडीने पाठवावे असे स्पष्ट केले. जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी इंग्रजी भाषेमध्ये आपली माहिती भरून पाठवावी व या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांच्याशी संपर्क सादर याची सूचना यावेळी करण्यात आली.

Web Title: World Bank representative in Nagpur on August 29; Communicate with Divisional Commissioner and District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.