आंतरिक शक्ती ओळखण्यासाठी कार्यशाळा

By Admin | Updated: February 1, 2015 00:56 IST2015-02-01T00:56:09+5:302015-02-01T00:56:09+5:30

ईश्वराने प्रत्येक माणसाला विविध शक्ती तसेच क्षमता देऊन पृथ्वीवर पाठविले आहे. परंतु जीवनात सामान्य माणूस शारीरिक व मानसिक क्षमतेशिवाय इतर क्षमतेबाबत काहीच माहिती नसते.

Workshops to identify inner strength | आंतरिक शक्ती ओळखण्यासाठी कार्यशाळा

आंतरिक शक्ती ओळखण्यासाठी कार्यशाळा

नागपूर : ईश्वराने प्रत्येक माणसाला विविध शक्ती तसेच क्षमता देऊन पृथ्वीवर पाठविले आहे. परंतु जीवनात सामान्य माणूस शारीरिक व मानसिक क्षमतेशिवाय इतर क्षमतेबाबत काहीच माहिती नसते. हे जाणून घेण्यासाठी कुठल्याच शिक्षणाची तरतूद नाही. आपल्यातील शक्तीची ओळख झाल्यास आपणच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. समृद्धी आणि सुख आपल्या पायाशी लोळण घेतात. अनेकजण तांत्रिक पंडित, मौलवींचा आश्रय घेऊन आपली फसवणूक करतात. अशा व्यक्तींना मुक्ती देण्यासाठी रेकी हिलींग फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. एन. के. शर्मा, डॉ. सविता शर्मा मागील २५ वर्षांपासून भारत आणि जगभर रेकी अँड माईंड पॉवर कार्यशाळेच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. नागपूर शहरातील सुप्रसिद्ध रेकी ग्रँड मास्टर आणि वास्तुतज्ज्ञ अल्का विरदी या शर्मा दाम्पत्त्याच्या कार्यशाळांचे आयोजन करतात. अशीच दोन दिवसीय कार्यशाळा ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला सीताबर्डीच्या हॉटेल हरदेवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत रेकी, टेलिपॅथी, अंत:प्रेरणा, रोगमुक्ती, तणावापासून मुक्ती आदींचे मार्गदर्शन केले जाईल. ३ आणि ४ फेब्रुवारीला हॉटेल हरदेवमध्ये आयोजित कार्यशाळेत डोळ््यांवर पट्टी बांधून आपल्या आंतरिक क्षमतांचा विकास करण्याचे ज्ञान देण्यात येईल. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Workshops to identify inner strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.