बाजारगाव येथे कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:34+5:302021-01-08T04:22:34+5:30
बाजारगाव : राज्य शासनाच्या ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत बाजारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

बाजारगाव येथे कार्यशाळा
बाजारगाव : राज्य शासनाच्या ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत बाजारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना विविध महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींना शासनाच्या निर्णयानुसार १५ व्या वित्त आयाेगातून निधी मिळणार आहे. हा निधी, कसा, कधी व किती मिळताे. प्राप्त झालेला निधी काेणत्या बाबींवर किती व कसा खर्च करायचा आहे. त्याचा हिशेब कसा ठेवायचा. त्यात स्थानिक महिला व नागरिकांचा सहभाग, यासह अन्य बाबींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) पाटील व अंगणवाडी पर्यवेक्षिका महंत उपस्थित हाेत्या. अरुणा उईके यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शिवा (सावंगा), शिरपूर व बाजारगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक व महिला उपस्थित हाेत्या. कार्यशाळेचे सूत्रसंचालन ग्रामसेवक हिंगवे यांनी केले.