शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नागपुरातील शासकीय कार्यालयातअंतर राखून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 23:58 IST

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता हळूहळू सूट देण्यास प्रारंभ होत आहे. शहरातील विविध कार्यालयांमध्ये कामकाजाला सोमवारी सुरुवात झाली. यादरम्यान सुरक्षितता आणि अंतराला महत्त्व दिले जात आहे. काही कार्यालयांमध्ये पहिल्याच दिवशी गर्दी उसळलेली पाहण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता हळूहळू सूट देण्यास प्रारंभ होत आहे. शहरातील विविध कार्यालयांमध्ये कामकाजाला सोमवारी सुरुवात झाली. यादरम्यान सुरक्षितता आणि अंतराला महत्त्व दिले जात आहे. काही कार्यालयांमध्ये पहिल्याच दिवशी गर्दी उसळलेली पाहण्यात आली.भूमीअभिलेख कार्यालयात जमिनीशी संबंधित कामकाजाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नागरिकांची चांगलीच गर्दी दिसत होती. भूमिअभिलेख विभागाचे नगर भूमापन अधिकारी भूषण मोहिते म्हणाले, गर्दी लक्षात घेता, सुरक्षित अंतराची काळजी घेतली जात आहे. यादृष्टीने प्रभागवार दिवस ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखता येईल.नागरिकांसाठी सुरक्षित अंतर राखणे अनिवार्य केले आहे. अर्जदारांसाठी टोकन पद्धत सुरू केली आहे. थर्मल स्क्रीनिंगनंतरच नागरिकांना कार्यालयामध्ये प्रवेश दिला जाईल. कार्यालयात रजिस्टर ठेवण्यात आले असून त्यात नाव, पत्ता याची नोंद घेतली जात आहे. नोंद केल्यावर सॅनिटायझरचा वापर आवश्यक केला आहे.प्रभागवार असे होईल कामकाजनगर भूमापन अधिकारी भूषण मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या व्यवस्थेनुसार यापुढे प्रभागवार कामे होतील. सोमवार, बुधवार व शुक्रवारी मौजा लेंड्रा, पांढराबोडी, अजनी, धंतोली, अंबाझरी, खामला, भामटी, जरीपटका, मानकापूर, दाभा, पोलीस लाईन टाकळी, झिंगाबाई टाकळी तसेच सोमलवाड्याशी संबंधित कामकाज होईल. सोमवार व बुधवारी चिंचभुवन, सोनेगाव, धरमपेठ, फुटाळा व तेलंखेडी, मंगळवार व गुरुवारी जयताळा, परसोडी, सीताबर्डी, हजारीपहाड, गोरेवाडा, काचीमेट, जाटतरोडी, बोरगाव येथील कामे होतील. संबंधित विभागाचे कर्मचारी ठरविलेल्या दिवशी हजर राहतील.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकारnagpurनागपूर