शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे : नागपुरात  ‘अ‍ॅक्वा लाईन’करिता कार्य वेगात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 21:02 IST

हिंगणा मार्गावर १५ ऑगस्टला मेट्रोचे ट्रायल रन झाल्यानंतर लवकरच अ‍ॅक्वा लाईन सुरू करण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे.

ठळक मुद्दे इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर ७०० कर्मचारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणा मार्गावर १५ ऑगस्टला मेट्रोचे ट्रायल रन झाल्यानंतर लवकरच अ‍ॅक्वा लाईन सुरू करण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे. शहरातील अत्यंत व्यस्त ठिकाण म्हणजे सीताबर्डी परिसर आहे. या ठिकाणी आव्हानात्मक कार्य करण्यात येत आहे.इंटरचेंज स्टेशनवरून खापरीपर्यंत मेट्रोची सेवा सुरू आहे. याच स्टेशनवरून लोकमान्यनगरपर्यंत अ‍ॅक्वा लाईन सुरूकरण्यात येणार आहे. यासाठी ७०० पेक्षा जास्त कामगार आणि अधिकारी कार्यरत आहेत. सामान्य नागरिकांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने जोखीम असलेले संपूर्ण कार्य रात्री ११ वाजतापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात येत आहे. ३५० टन वजन क्षमतेच्या क्रेनच्या साहाय्याने कार्य पूर्ण केले जात आहे.अ‍ॅक्वा लाईन आणि इंटरचेंज स्टेशनचे सीएमआरएसतर्फे परीक्षण करण्यात आले. याच्या काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्वा लाईनवर २० मीटर लांबीचे स्टील गर्डर उभारण्यात आले. तसेच ४० मीटर लांबीचे कॉक्रिट बीमचे कार्य झाले आहे. पूर्व-पश्चिम अ‍ॅक्वा लाईनवर हायरग्रेड (३५०) गर्डर लावण्यात आले असून येथे प्लॅटफॉर्म तयार करण्याचे कार्य पूर्ण करण्यात येत आहे. इंटरचेंज स्टेशनवर अ‍ॅक्वा लाईन प्लॅटफार्मच्या रूफ शीट कार्यसाठी १०० आणि प्लॅटफार्मवर ग्रेनाईट लावण्यासाठी ५० कुशल कामगार कार्यरत आहे. टॉवर के्रनच्या साहाय्याने हे कार्य होत असून या क्रेनची क्षमता ९० टन आणि उंची ४० फूट आहे. जमिनीपासून २७ मीटर उंचीवर प्लॅटफार्म असणार आहे. रूफ शीटसह प्री-इंजिनिअरिंग बिल्डिंगचे (पीईबी) कार्य पूर्णत्वास आले आहे. अ‍ॅक्वा लाईनवर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधी प्राथमिक कार्य जसे ट्रॅक, सिग्नलिंग, टेलिकॉम, यात्रीसुविधासंबंधी लिफ्ट आणि इतर कार्यदेखील अंतिम टप्प्यात आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर