अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:21+5:302021-01-19T04:10:21+5:30
पाटणसावंगी : अज्ञात भरधाव वाहनाने जाेरात धडक दिल्याने गंभीररीत्या जखमी झालेल्या सायकलस्वार कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पाटणसावंगी-सावनेर ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यू
पाटणसावंगी : अज्ञात भरधाव वाहनाने जाेरात धडक दिल्याने गंभीररीत्या जखमी झालेल्या सायकलस्वार कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पाटणसावंगी-सावनेर मार्गावरील श्रीधर कास्टिंग कंपनीजवळ साेमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
मनाेहर खुशाल बाेंडे (५६, रा. वाकीपुरा, पाटणसावंगी) असे मृताचे नाव असून, ताे माळेगाव येथील मालू पेपर मिलमध्ये कामगार हाेता. साेमवारी सकाळच्या सुमारास कामावर जात असताना समाेरून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने मनाेहर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाटणसावंगी चाैकीतील पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास कृष्णा जुनघरे करीत आहेत.