काम वाढेल, वेळही वाचेल!
By Admin | Updated: May 5, 2015 02:04 IST2015-05-05T02:04:25+5:302015-05-05T02:04:25+5:30
लहानसहान कामासाठी लोकांना मुंबईत येण्याची गरज भासू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिवालय(हैद्राबाद हाऊस) सुरू करण्यात आले आहे. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊ स पडला.

काम वाढेल, वेळही वाचेल!
नागपुरात सचिवालय : अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारींचा होईल निपटारा
नागपूर : लहानसहान कामासाठी लोकांना मुंबईत येण्याची गरज भासू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिवालय(हैद्राबाद हाऊस) सुरू करण्यात आले आहे. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊ स पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो निवेदने स्वीकारली. योग्य तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निदेश दिले. सचिवालयाचे कामकाज येथे सुरू झाल्याने तक्रारींचा लवकर निपटारा करावा लागणार आहे. यामुळे प्रशासनाचे काम वाढेल. परंतु लोकांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
तक्रारींचा तातडीने निपटारा होणार असल्याने तक्रारक र्त्यांना दिलासा मिळेल, असे मत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. रविवारी मुख्यमंत्र्यांनी स्वत: सचिवालयात लोकांच्या तक्र ारी जाणून घेतल्या. पहिल्याच दिवशी शेकडो निवेदने प्राप्त झाली. त्यांनी तक्रारक र्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे तातडीने न्याय मिळेल अशी त्यांना आशा आहे. सचिवालयाचे कामकाज नागपुरात सुरू झाल्याने अधिकाऱ्यांचे काम वाढले आहे. परंतु यामुळे लोकांना लवकर न्याय मिळणार आहे. तक्रारी वाढल्याने स्थानिक प्रशासनाचे काम वाढले आहे. प्राप्त तक्रारींचा विचार करता निपटाराही त्याच गतीने होण्याची अपेक्षा आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाला काम करावे लागेल. विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा प्रशासनाला गतिमान व्हावे लागेल, तरच तक्रारींचा निपटारा करणे शक्य होईल.