फुटाळा-अंबाझरी रोडच्या एका बाजूचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:31+5:302021-01-08T04:24:31+5:30
नागपूर : फुटाळा चौक ते अंबाझरी तलाव रोडच्या एका बाजूचे सिमेंटीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, दुसऱ्या बाजूचे काम अद्याप ...

फुटाळा-अंबाझरी रोडच्या एका बाजूचे काम पूर्ण
नागपूर : फुटाळा चौक ते अंबाझरी तलाव रोडच्या एका बाजूचे सिमेंटीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, दुसऱ्या बाजूचे काम अद्याप सुरूच आहे. या रोडच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून रोज वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. परंतु, एका बाजूचे काम संपल्यामुळे वाहनचालकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या रोडने रोज बजाजनगरला जाणारे अशोक पाटील यांना आधी रोड खराब असल्यामुळे त्रास हाेत होता. त्यानंतर सिमेंटीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर त्रास व्हायला लागला. आता एका बाजूचे काम पूर्ण झाल्यामुळे त्रास कमी झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली. सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झालेल्या भागातील फुटपाथवर पेविंग ब्लॉक लावले जात आहेत. हे काम युद्धस्तरावर सुरू आहे.