मानकापूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण
By Admin | Updated: September 3, 2014 01:16 IST2014-09-03T01:16:05+5:302014-09-03T01:16:05+5:30
अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मानकापूर उड्डाणपुलाचे काम अजून पूर्णच झालेले नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. असे असताना पूल बांधणार्या ओरिएंटल

मानकापूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण
नागरिकांना फटका : मनसेचा आंदोलनाचा इशारा
नागपूर : अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मानकापूर उड्डाणपुलाचे काम अजून पूर्णच झालेले नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. असे असताना पूल बांधणार्या ओरिएंटल कंपनीने रेल्वेला ‘कम्पलिशन सिर्टिफकेट’ दिलेच कसे, असा सवाल मनसेचे उप शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला असून, हे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कंपनीला दिला आहे.
मानकापूर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्यांची सोय झाली असली तरी या परिसरात राहणार्या हजारो नागरिकांचे रोजचे जगणेच कठीण झाले आहे. शाळा, कॉलेज, मेडिकल, एटीएम, दवाखाना अशा सर्व सुविधा पुलाच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे झंिगाबाई टाकळीच्या बाजूने आहेत. त्यामुळे या बाजूच्या लोकांना रोज तीन किलोमीटरचा फेरा करून जावे लागत आहे.
मुलांच्या शाळांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आॅटो आता या बाजूला यायला तयार नाहीत. किराणा दुकानातील माल येत नसल्याने दुकाने बंद पडत आहेत. १५ दिवसांपूर्वी हा पूल वाहतुकीला खुला करण्यात आल्यानंतर रेल्वेने जुने गेट बंद करून टाकले. त्यामुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी येथे दोनदा रेल्वे रोको आंदोलन केले.
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाचे प्रबंधक ओ.पी. सिंग यांना निवेदन देऊन रेल्वे फाटक पुन्हा सुरू करण्याची अथवा आरयूबी करण्याची मागणी केली. मात्र, रेल्वेने देशभरातील सर्वच फाटक बंद करायचा निर्णय घेतला असल्याने आता हे फाटक पुन्हा सुरू करता येणार नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी तोडगा निघत नसल्याने सोमवारी सकाळी परिसरातील शेकडो नागरिकांनी बंद असलेल्या रेल्वे गेटजवळ धरणे आंदोलन केले. प्रशांत पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांचे समर्थन केले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांशीही त्यांनी या संबंधात चर्चा केली. मटा शी बोलताना पवार म्हणाले की, पुलाच्या अलीकडून आणि पलीकडून ये-जा करण्यासाठी पुलाला पायऱ्या करण्यात येणार होत्या. या पायर्यांचे काम अजून पूर्ण झालेले नाही. मग स्थानिक रिहवाशांची सोय न करताच पुलाचे काम करणार्या ओरिअएंटल कंपनीने रेल्वेला काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र कसे दिले, असा प्रश्न आहे.(प्रतिनिधी)
रात्री पुलाखाली अंधार विद्यार्थिनी असुरक्षित
या पुलाच्या बाजूला जे सर्व्हिस रोड आहेत तेथे अजून पथदिवे नाहीत. त्यामुळे फेरा मारून येतो म्हटले तरी ते सुरक्षित नाही. रात्री या पुलाखालील रस्त्यावर अंधार असतो. असमाजिक तत्त्वांनी या ठिकाणी आपला अड्डाच बनविला आहे. काही दिवसांपूर्वी येथून रात्री ट्यूशन क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनींना पकडण्याचा प्रयत्न असमाजिक तत्त्वांनी केला. त्यामुळे या परिसरातील पालक भयभीत झाले आहेत. याची दखल घेण्याची पवार यांनी सूचना केली. मंगळवारी ओरिएंटल कंपनीचे अधिकारी अपूर्ण कामाची पाहणी करणार असून त्यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या जातील, असेही पवार यांनी सांगितले.