जलालखेडा ते मुक्तापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:09+5:302021-02-20T04:20:09+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा-मुक्तापूर-थडीपवनी रस्त्याच्या बांधकामाला दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला ...

जलालखेडा ते मुक्तापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा-मुक्तापूर-थडीपवनी रस्त्याच्या बांधकामाला दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याचे दिसत आहे. त्यात जलालखेडा ते थडीपवनी या रस्त्यावर ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी अवस्था झाली होती. या रस्त्याला जवळपास ९ ते १० गावे जोडल्या गेली आहेत. त्यामुळे शेकडो नागरिक कामानिमित्त जलालखेडा येथे येत असतात. परंतु रस्ता खराब असल्यामुळे मोठा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही नागरिक त्यांची दुचाकी स्लिप झाल्यामुळे जखमीसुद्धा झाले. याबाबत ‘लोकमत’ने २८ जानेवारीला वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जलालखेडा-मुक्तापूर-थडीपवनी हा रस्ता मंजूर असूनही निधीअभावी रस्त्याचे काम थांबले असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर दोन दिवसामध्ये रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य टाकायला सुरुवात झाली. मागील आठ दिवसापासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.