फॉर्च्युन फाऊंडेशनचे कार्य प्रशंसनीय

By Admin | Updated: December 11, 2015 03:51 IST2015-12-11T03:51:22+5:302015-12-11T03:51:22+5:30

फॉर्च्युन फाऊंडेशन ही संस्था बेरोजगार व संधी यांच्यात सेतू निर्माण करण्याचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.

The work of Fortune Foundation is laudable | फॉर्च्युन फाऊंडेशनचे कार्य प्रशंसनीय

फॉर्च्युन फाऊंडेशनचे कार्य प्रशंसनीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : खादी हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर : फॉर्च्युन फाऊंडेशन ही संस्था बेरोजगार व संधी यांच्यात सेतू निर्माण करण्याचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.
भारतातील नामवंत खादी व ग्रामीण उद्योगांच्या आकर्षक उत्पादनांचे खादी-हस्तकला कौशल्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, अनिल सोले, नागो गाणार, जयकुमार रावल, मोहम्मद जहीर, चरण वाघमारे, संभाजी पाटील निलंगेकर, सरदार तारासिंग, योगेश सागर, संजय केळकर, भाई गिरडकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, देवयानी फरांदे, स्मिता वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.
हे प्रदर्शन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाईन्स येथे २० डिसेंबरपर्यंत दुपारी १.३० ते रात्री १० पर्यंत सुरू राहील. स्टॉलवर सूत, खादी, कोसा, रेशीमपासून तयार केलेले उच्च दर्जाचे कापड आणि उत्पादने, संत्रा, सेंद्रीय माल, सिंदीपासून तयार केलेले झाडू, बांबू, मध, मोहापासून तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल, याशिवाय ग्रामीण संस्कृतीचे जतन केलेले कुंभारकाम, चर्मोद्योग, मूर्तिकला यांचेही दर्शन नागरिकांना घडणार आहे. सायंकाळी खुल्या रंगमंचावर स्वरसाधना या सांस्कृतिक संस्थेतर्फे मराठी व हिंदी गाणे, मुशायरा, वऱ्हाडी कवी संमेलन, हिंदी कवी संमेलन आदी कार्यक्रम सादर होतील. संचालन व आभारप्रदर्शन संदीप जाधव यांनी केले. प्रदर्शनासाठी जयंत पाठक, कपिल चांद्रायण, नवनीतसिंग तुली, चैतन्य मोहाडीकर, चेतन कायरकर, नगरसेविका रश्मी फडणवीस, वर्षा ठाकरे, अभिनंदन पळसापुरे, संजय बंगाले, विजय फडणवीस, बबली मेश्राम, अजय फडणवीस, हेमंत दीक्षित प्रयत्नरत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The work of Fortune Foundation is laudable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.