शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय मृत्यूच्या ढिगाऱ्यावर दररोज सुरू होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:12 IST

Nagpur : 'एसबीएल'मध्ये कमी शिकलेल्या कामगारांसाठी चक्क इंग्रजीत सूचना

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राऊळगाव येथील 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' कंपनीत झालेल्या स्फोटात कित्येक कुटुंबांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. अक्षरशः मृत्यूच्या ढिगाऱ्यावर दररोज काम करणाऱ्या कामगारांना कंपनीने कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळावरील अवशेष आणि इतर कामगारांनी सांगितलेल्या त्यांच्या आपबितीतून हा प्रकार समोर आला आहे.

कंपनीच्या 'नोनल क्रिम्पिंग' या युनिटमध्ये डेटोनेटर्सच्या शेल्सच्या पॅकेजिंगचे काम करण्यात येत होते. हे काम अत्यंत जिकिरीचे असते. दोन कामगारांचे साहित्य एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी संबंधित युनिटमध्ये वेगवेगळे लहान केबिन्स तयार करण्यात आले होते. तेथे मशीन्सच्या आधारे पॅकेजिंग व क्रिम्पिंगचे काम सुरू होते. जोखमीचे काम असल्याने यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते. मात्र, कंपनीकडून गावांमधील महिलांना हे काम देण्यात आले होते.

निष्काळजीपणामुळे स्फोट

सध्या ही घटना कशी झाली याची चौकशी सुरू झाली आहे. परंतु, पेसो, 'डिश'चे (डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) अधिकारी आणि कामगार आयुक्त विभागाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या सर्वांनी गेल्या वर्षभरात म्हणावे तसे काम केले नाही. विभागीय आयुक्त आणि पोलिस अधीक्षक या विभागांची जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाईची शिफारस करतील.घटनेचा प्राथमिक रिपोर्ट आला असून निष्काळजीपणामुळे स्फोट झाल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात अंतिम अहवाल येईल व जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सूचनांच्या नावाखाली अशीदेखील थट्टा...

एसबीएलमधील बहुतांश कामगारांना इंग्रजी येत नाही. मात्र, अगदी स्फोट झालेल्या युनिटसह इतर ठिकाणी जागोजागी कंपनीकडून 'स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर'ची नियमावली चक्क इंग्रजीत लावण्यात आली आहे.

'लोकमत'ला त्यातील एक नियमावलीचा कागद कामगारांनी दिला. त्याचा फॉन्टदेखील इतका लहान आहे की जवळ गेल्याशिवाय त्या सूचना स्पष्टपणे दिसतदेखील नाही. त्यातील किती सूचना कामगारांना प्रत्यक्ष समजल्या असतील हा एक मोठा प्रश्नच आहे.

'शेल' की 'सेल' ?

कंपनीकडून कामगारांना प्रशिक्षण दिल्याचा दावा करण्यात आला. मात्र 'लोकमत'ने कामगारांना विचारणा केली असता बोटांवर मोजता येतील इतके कामगार सोडले तर सर्व जण 'शेल'ला 'सेल' असेच म्हणत होते. यातूनच किती 'शास्त्रशुद्ध' प्रशिक्षण देण्यात आले होते हे स्पष्ट झाले.

अपघात 'टार्गेट'मुळे ?

संबंधित युनिटसह इतर ठिकाणी प्रत्येक कामगारांना दररोजच्या कामाचे विशिष्ट टार्गेट देण्यात आले होते. प्रत्येक कामगाराला २५ शेल्सचे बॉक्स भरणे अनिवार्य होते. एका बॉक्समध्ये १०० शेल्स येतात.'

English
हिंदी सारांश
Web Title : Untrained Workers Risk Lives Daily at Explosives Factory: Report

Web Summary : SBL Energy lacked proper training, leading to a fatal explosion. Workers handled dangerous detonators without adequate skills. Negligence and unrealistic targets contributed to the accident, prompting investigations into safety oversights and accountability for the tragedy.
टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोट