महिला ही समाजातील मोठी शक्ती!

By Admin | Updated: April 25, 2016 02:52 IST2016-04-25T02:52:40+5:302016-04-25T02:52:40+5:30

महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहे. मुळातच महिला ही समाजातील फार मोठी शक्ती आहे.

Women's power in the society! | महिला ही समाजातील मोठी शक्ती!

महिला ही समाजातील मोठी शक्ती!

सोनार समाजाचा महिला मेळावा : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहे. मुळातच महिला ही समाजातील फार मोठी शक्ती आहे. सोनार समाजाच्या या मेळाव्याने महिलांना एक दुसऱ्याशी जोडण्याचे काम केले आहे. समाजातील महिलांनी डॉ. स्मिताताई कोल्हे यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सोनार समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवर्णालंकार’ या मासिकाच्यावतीने रविवारी राज्यस्तरीय सोनार महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे होते. अतिथी म्हणून नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैश्य सुवर्णकार समाजाचे दत्तात्रय वझरकर, सुवर्णालंकार मासिकाचे मुख्य संपादक प्रकाश माथने, सुरेश आसरे, भाजपच्या महिला आघाडी महासचिव माया हाड, देवेंद्र शेरेकर व मुकुंदराव शहाने उपस्थित होते.
यावेळी गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे, विजयराव फळणीकर व साधना फळणीकर यांना ‘सोनार गौरव पुरस्कार’ प्रदान करून, त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोनार समाजातील इतर ३० कर्तृत्ववान महिलांचा सुद्धा गौरव करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून हा सोनार समाजातील महिलांचा अभुतपूर्व मेळावा असल्याचे सांगितले. शिवाय त्यांनी सोनार समाजातील महिलांनी या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन पुढे यावे, असेही सांगितले. या कार्यक्रमाला सुचिता रोकडे, माला रोकडे, नीता बांगरे, माला रोकडे, भारती अडमकर, विद्या कावळे, पूजा सांगुळले व सुलभा माथने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन अनिल मालोकर व कांचन भुताळ यांनी केले. प्रकाश माथने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Women's power in the society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.